Error! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा

Instagram Down : सोशल मीडियावरील लोकप्रिय अॅप इन्स्टाग्राम महिन्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाले. परिणामी जगभरातील लाखो युजर्स त्रस्त झाले होते. 

Updated: Jun 9, 2023, 01:56 PM IST
Error! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा title=

Instagram Down News In Marathi : हल्ली प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर केला जातो. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि अनेक प्लॅटफॉर्म आपण वापरतो. यातील एक लोकप्रिय असे Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे.

युजर्सच्या सांगण्यावरुन त्यांना इन्स्टाग्राम अॅप वापरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे यूजर्सना आधी नेटचा इश्यू वाटला. पण नेट सर्व्हिस व्यवस्थित सुरु होती. इतर अॅप्सही व्यवस्थित चालू होते. केवळ Instagramla  समस्या येत होत्या. त्यामुळे या युजर्सनी लगेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार करण्यास सुरुवात केली. 

यासंदर्भात साइट्स डाउन झाल्याची अर्थातच आउटेजचा मागोवा घेणारी साइट डाउनडिटेक्टरने या गोष्टीची पुष्टी केली आहे. अहवालानुसार 56 टक्के वापरकर्त्यांना Instagram अॅपमध्ये समस्या येत होती. तर 23 टक्के वापरकर्त्यांना लॉग इन करण्यात समस्या येत आहेत. 21 टक्के वापरकर्त्यांच्या सर्व्हर त्रुटीच्या तक्रारी आहेत. इन्स्टाग्राम व्यतिरिक्त, अनेक फेसबुक वापरकर्त्यांनी देखील आउटेजबद्दल तक्रार केली आहे. फेसबुक वापरकर्त्याची टाइमलाइन रिफ्रेश होत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. 

महिन्याचा दुसऱ्यांदा इंस्टाग्राम डाऊन

विशेष म्हणजे एका महिन्यात इन्स्टाग्रामवरील हा दुसरा आउटेज आहे. याआधी गेल्या महिन्यात 21 मे रोजी इंस्टाग्राम अनेक तास ठप्प झाले होते. इन्स्टाग्राममधील तांत्रिक बिघाडामुळे हे घडत आहे असल्याचे समोर आले आहे. जगभरातील 1,80,000 वापरकर्त्यांना इन्स्टाग्रामच्या बगचा फटका सहन करावा लागत आहे. Downdetector.com ने दिलेल्या अहवालात त्यांनी म्हटले की, यूएस मध्ये फक्त 100,000 वापरकर्ते, 24,000 कॅनडा आणि 56,000 यूकेमधून युजर्सना यामुळे त्रास सहन करावा लागला. या समस्येबद्दल सोशल मीडिया यूजर्सच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत...