Jio, Airtel आणि Vi चे A1 प्लॅन, कमी किंमत आणि जास्त फायदा

वोडाफोन, जिओ आणि एअरटेल या तिन्ही कंपन्यांनी कमी किमतीमध्ये जास्त फायदा मिळवून देणारा प्लॅन आणला आहे.

Updated: Sep 17, 2021, 07:47 PM IST
Jio, Airtel आणि Vi चे A1 प्लॅन, कमी किंमत आणि जास्त फायदा title=

मुंबई: लॉकडाऊन आणि कोरोनामुळे पुन्हा एकदा कामापासून ते लहान मुलांपर्यंत आता सर्वजण मोबाईलचा वापर अति करू लागले आहेत. सगळी काम मोबाईलवर होत आहेत. त्यामुळे सहाजिकच डेटा वापरला जातो. वेगवेगळ्या कंपन्यांनी एकमेंकाशी स्पर्धा करत कमी किमतीमध्ये जास्त फायदा देणारे प्लॅन आणत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म ते वर्क फ्रॉम होम हे मोबाईल डेटावरून असतं. 

वोडाफोन, जिओ आणि एअरटेल या तिन्ही कंपन्यांनी कमी किमतीमध्ये जास्त फायदा मिळवून देणारा प्लॅन आणला आहे. Jio ने नुकताच आपल्या वेबसाईटवर नवीन प्लॅन अपडेट केला. 499 रुपयांना जिओने खास प्लॅन दिला आहे. यामध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन मिळणार आहे. 

499 रुपयांपासून सुरू होणाऱ्या या प्लानमध्ये तुम्हाला दररोज 3GB डेटा आणि डिस्ने + हॉटस्टारचे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल; या प्लानची वैधता 28 दिवसांची असणार आहे. याशिवाय 349 चा प्लॅन देखील आहे मात्र त्यामध्ये तुम्हाला OTT प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. 3 GB डेटा 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळते.

एअरटेल कंपनीने 349 रुपयांचा खास प्लॅन आणला आहे. त्यामध्ये ग्राहकांना 2.5 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय 2 जिबी डेटा कुपनमध्ये मिळणार आहे. याशिवाय  अमेझॉन प्राइम मोबाईल सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. यामध्ये 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय FasTag आणि 100 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळणार आहे.

दुसरा एअरटेलचा प्लॅन 499चा आहे. 28 दिवसांची वैधता आणि 3 GB डेटा मिळणार आहेत. 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग, डिझनी-हॉटस्टार याचं सब्स्क्रिप्शन मिळणार आहे.

वोडाफोन आयडियाचा 501 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये, तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, वीकेंड डेटा रोलओव्हर, दररोज 100 एसएमएस, दररोज 3 जीबी डेटा, व्ही मूव्हीज आणि टीव्हीची सदस्यता आणि डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सदस्यता एक वर्ष मिळेल.

 वोडाफोनच्या 99 आणि 449 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, कंपनी तुम्हाला G5 प्रीमियम मेम्बर्शिप डबल डेटा फिटनेस मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला दररोज 4GB इंटरनेट, 100 SMS दररोज आणि अमर्यादित कॉलिंगसह स्ट्रीमिंग लाभ मिळतील.