Jio Diwali Dhamaka offers: दिवाळीच्या दिवसांत अनेक मोठ्या मोठ्या कंपन्या भन्नाट ऑफर्स घेऊन येतात. जिओ कंपनीनेदेखील त्यांच्या ग्राहकांसाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गंत जिओ कंपनी त्यांच्या ग्राहकांना वर्षभरापर्यंत फ्री एअरफायबर कनेक्शन देणार आहे. तुम्हीदेखील या ऑफरला लाभ घेऊ शकता. जाणून घेऊया नक्की काय आहे ही ऑफर आणि त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो.
दिवाळी धमाका म्हणून ही ऑफर कंपनीने आणली आहे. कंपनी ग्राहकांना एक वर्षांपर्यंत मोफत एअरफायबर कनेक्शन देणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना एक खास प्लान घ्यावा लागणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना रिलायन्स डिजिटलचे कूपनदेखील मिळणार आहेत. जे त्यांनी घेतलेल्या प्लानच्या किमतीच्या बरोबरच असणार आहे. त्यामुळं ही ऑफर भन्नाट असणार यात काही शंकाच नाही.
तसंच, या प्लॅनमध्ये 800 हून अधिक टिव्ही चॅनेल प्रेक्षकांना मिळणार आहे. तर, 13हून अधिक OTT प्लॅटफॉर्म प्रेक्षकांना सब्सक्रिप्शन मिळणार आहे. ज्यामुळं तुम्ही अगदी आरामात वेबसीरीज आणि चित्रपट पाहू शकणार आहेत. तसंच, घरात फ्री वाय-फायदेखील मिळणार आहे. ज्यामुळं कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्ही कितीही लिमिटपर्यंत इंटरनेट वापरु शकता. या प्लानमध्ये तुम्हाला घरात वायफाय लावण्यासाठीही 1 हजार रुपये मिळणार आहेत.
599 रुपयांपासून सुरू होतो प्लान यात तुम्हाला 30 Mbps चा स्पीड मिळणार आहे. 800 हून अझिक जास्त टीव्ही चॅनेल मिळणार असून 11 ते 13 ओटीटी अॅप्स फ्री असून वायफाय राउटरदेखील मिळणार आहे.
888 रुपयांचा प्लानः या प्लानमध्ये तुम्हाला 30 Mbpsचा स्पीड मिळणार असून 11 ते 13 OTT अॅप्स फ्रीमध्ये मिळणार आहे. यातील काही अॅप्स खूप चांगले आहेत. यात तुम्हाला 4K सेट-टॉप बॉक्सदेखील मिळणार आहे.
899 रुपयांचा प्लानः यात तुम्हाला 100 Mbps चा स्पीड मिळणार असून 888 प्लानप्रमाणेच सुविधा मिळणार आहेत.
1,199 रुपयांचा प्लानः यात तुम्हाला 100 Mbps चा स्पीड मिळणार आहे. तसंच, त्यात 11 ते 14 OTT अॅप्स फ्री मिळणार आहे आणि खूप चांगले उपकरण मिळणार आहेत.
तुम्ही जिओची वेबसाइट किंवा जिओ अॅपवर जाऊन पाहू शकता की तुमच्या परिसरात एअरफायबर सुविधा आहे की नाही ते. त्यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर आणि पिन कोड टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्लान निवडावा लागेल आणि रिचार्ज करावा लागेल. असं केल्याने तुम्हाला एक वर्षापर्यंतस मोफत एअरफायबर मिळेल त्याचबरोबर अनेक फायदेदेखील मिळणार आहेत. जर तुम्हाला इंटरनेटचा स्पीड वाढवायचा असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे.