नवी दिल्ली : 'क्रिकेच वर्ल्डकप २०१९' (World Cup 2019) मध्ये टीम इंडिया आज आपली पहिलीच मॅच खेळणार आहे. हीच संधी साधत रिलायन्स जिओनं आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी एक खास ऑफर बाजारात उतरवलीय. जिओनं २५१ रुपयांचं एक विशेष डाटा पॅक 'सिक्सर' सादर केलंय. या पॅकचं वैशिष्ट्य म्हणजे, सद्य डाटा पॅक संपल्यानंतरही ग्राहक लाईव्ह मॅच पाहू शकतील. हा पॅक ५१ दिवसांसाठी वैध राहील. तसंच या पॅकमध्ये एकूण १०२ जीबी डाटा मिळेल. सोबतच या ग्राहकांना हॉटस्टारवर कोणत्याही शुल्काविना आपोआपच वर्ल्डकपच्या सर्व मॅच पाहता येतील.
आज दुपारी तीन वाजता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ही मॅच रंगणार आहे. यासाठी टीम पुढीलप्रमाणे आहेत...
भारत : विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, रोहित शर्मा, के एल राहुल, महेंद्र सिंह धोनी, हार्दिक पंड्या, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा
दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), क्विंटोन डिकाक, एडेन मार्कराम, हाशिम अमला, जेपी डुमिनी, डेविड मिलर, ब्यूरान हेंडरिक्स, कागिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, एंडिले फेलुक्वायो, तबरेज शम्सी, इमरान ताहिर, लुंगी एंगिडी, क्रिस मॉरिस, रासी वॉन डेर डुसेन
frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/live/embed" width="560">
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकामध्ये ४ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील केवळ एकच लढत भारत जिंकू शकलाय. तर दक्षिण आफ्रिकेनं ३ वेळा बाजी मारलीय. तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण ८३ सामने खेळले गेले आहेत. यातील ३४ सामन्यांमध्ये भारत तर ४६ वेळा प्रोटीयाज विजयी झालेत. तर ३ सामने अनिर्णित राहिलेत.