मुंबई : आयआयटी मुंबई प्लेसमेंटच्या पहिल्या फेरीची सुरूवात झालीय. पहिल्या फेजमध्ये १३८ विद्यार्थी प्री प्लेसमेंट संधी मिळवण्यात यशस्वी झालेयत. तर दुसऱ्या फेजच्या मुलाखती सुरू आहेत. आयआयटी प्लेसमेंट फेज २ च्या मुलाखतीनंतर मायक्रोसॉफ्ट, गूगलकडून कोट्यवधीच्या ऑफर्स आल्या आहेत.
मायक्रोसॉफ्ट उबर पे पल आणि पहिल्यांदाच सहभागी होणाऱ्या रुब्रिक या कंपन्यांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यंदाच्या प्लेसमेंटसाठी १.१० लाख अमेरिकी डॉलरची रक्कम निश्चित करण्यात आलीय. त्यामुळं विद्यार्थ्यांना किती भरगच्च पगाराची नोकरी मिळते याची उत्सुकता आहे.
आज १७०० विद्यार्थ्यांनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी नोंदणी केलीय. त्यासाठी जवळपास २२५ कंपन्या आयआयटी मुंबईत दाखल झाल्यायत. दाही कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या शाखेच्या विद्यार्थ्यांना अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी झालेल्या वादानंतर फ्लिपकार्ट यंदा काय ऑफर देते याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे.