मुंबई : फेसबुकची ओळखच 'लाईक' हे बटण आहे.
फेसबुकवर कोणत्याही गोष्टीला पसंती देण्यासाठी, पाठिंबा देण्यासाठी 'लाईक' बटण क्लिक केले जाते. पण या बटणाचा ओळख करून देणारा आणि या बटणाचा निर्माता इंजिनियर जस्टिन रोसेंसटीन याने फेसबुक हे नशेसारखे असल्याचे म्हणत फेसबुक अॅपचा डिलिट केले आहे.
एका वेबसाईटच्या माहितीनुसार, जस्टिन रोसेंसटीनला फेसबुकचे आणि त्यामधील लाईक बटणचे व्यसनच लागले होते. जस्टिनच्या मते,'एखादी गोष्ट चांगल्या हेतुने बनवली जाते परंतू कालांतराने त्याचा नकळत वाईट परिणाम होण्यास सुरूवात होते.' जस्टिनने फेसबुकप्रमाणेच रेडिट अअणि स्नॅपचॅटदेखील ब्लॉक केले आहे.
एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणार्या लोकांमध्ये नैराश्यदेखील झपाट्याने वाढते. जितके कमी अॅप वापराल तेवढी नैराश्याची शक्यता कमी होते. इंस्टाग्राममुळे नैराश्याची भावना अधिक वाढते. तरूणांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यास अशा गोष्टी खूपच त्रासदायक ठरत आहेत.