मुंबई : प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणार्यांमध्ये सतत दीड दोन वर्षांनी नोकरी बदलण्याचा ट्रेंड असतो.
कॉस्ट कटिंगच्या नावाखाली आजकाल कोणाचीही नोकरी कधीही जाते. अशावेळेस नोकरी शोधण्याचं काम थोडं अधिक सुकर करण्यासाठी 'कामकाज' हे अॅप फायदेशीर ठरणार आहे.
कोणत्या क्षेत्रात कुठे नोकरीची नवी संधी आहे? याची माहिती 'कामकाज' अॅपमध्ये लोकांना मिळणार आहे. या अॅपमध्ये सेवानिवृत्त लोकांनाही नोकरीच्या संधीची माहिती मिळणार आहे. कॉर्पोरेट सेक्टरमधील कंपन्या आणि इच्छुक उमेदवार यांच्यातील दुवा ठरणार आहे. 'कामकाज' हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. यामुळे नोकरी देणार्यांना आणि ती शोधणार्यांसाठीही हे सोयीचे ठरणार आहे.
नोकरी शोधणारीव्यक्ती त्यांची माहिती भरून ठेवू शकतात. ज्यांना डिजिटलचे ज्ञान नसेल त्यांच्यासाठी मिस्ड कॉलची सोय ठेवण्यात आली आहे. मिस कॉल देऊनही आपली माहिती नोंदवू शकतात.