मुंबई : आपल्याला हे माहितच आहे की, सध्या सायबर क्राईम फार वाढलं आहे. फसवूण करणारे भामटे लोकांना फसवण्यासाठी या ना त्या मार्गाचा वापर करताता आणि आपली माहिती त्यांच्याकडे ठेवतात. बऱ्याचदा हे भामटे आपल्या बँकिंग सर्विसेस बाबात माहिती मिळवताता आणि आपल्याला पैशांचा गंडा घालतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, की या व्यतिरिक्तही असे काही सायब्रर क्राईम करणारे आहेत. जे आपली पर्सनल माहिती जसे की, फोटो, व्हिडीओ, सर्चिंग इन्फोमेशन, कॉन्टॅक्ट अशा अनेक गोष्टींची माहिती दुसऱ्या कंपनीला विकातात, ज्यामुळे आपली पर्सनल माहिती दुसऱ्या लोकांच्या हातात जाते.
सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यामध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो. यामध्ये फसवणूक करणारे तुमचा फोन किंवा ईमेलद्वारे देखील तुमची माहिती चोरु शकतात.
अशा परिस्थितीत आता आपले Gmail खाते कसे सुरक्षित ठेवायचे याबाबत लोकं विचार करु लागतात, तर आता चिंता करण्याची गरज नाही.
आज आम्ही तुमच्यासाठी या समस्येवर उपाय घेऊन आलो आहोत आणि तुम्हाला सांगत आहोत की तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाले आहे की नाही हे तुम्ही कसे तपासू शकता आणि तुमच्या खात्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी कोणते उपाय केले जाऊ शकतात.
स्टेप 1 : सर्वप्रथम तुम्हाला Google Chrome ब्राउझरवर मोफत पासवर्ड चेकअप सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागेल. एकदा इंस्टॉल केल्यावर, Chrome एक्सटेंशन तुमच्या लॉगिन क्रेडेंशियल तपासेल.
स्टेप 2: Google च्या डेटाबेसमधील 40 दशलक्ष पासवर्डपैकी कोणत्याही पासवर्डशी तुमचे युजर नेम किंवा पासवर्ड जुळत असल्यास, सॉफ्टवेअर तुम्हाला अलर्ट करेल.
स्टेप 3: यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्हाला संबंधित वेबसाइटच्या पासवर्ड चेकअपबद्दल माहिती दिली जाईल. या फीचरच्या मदतीने तुम्ही ब्राउझरवर सेव्ह केलेला कोणताही पासवर्ड तपासू शकता. डेटा लीक झाल्याची माहिती तुम्हाला मिळेल.
स्टेप 4: तुमचे खाते हॅक झाले असल्यास, ते सुरक्षित करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील.
प्रथम तुम्हाला तुमच्या खात्याचा पासवर्ड बदलावा लागेल. फक्त जीमेलच नाही तर लीकमुळे प्रभावित झालेल्या सर्व सेवांचा पासवर्ड तुम्हाला बदलावा लागेल.
1. खाते रिकवर पेजवर जा.
2. जर तुम्हाला पासवर्ड आठवत नसेल तर वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
3. तुमचा रिकवर ईमेल किंवा फोन नंबर वापरा
4. आता तुमच्या खात्याच्या मालकीची पुष्टी करण्यासाठी Gmail त्या फोन नंबरवर किंवा ईमेलवर रिकवरी कोड पाठवेल.
5. याशिवाय, तुम्ही खाते सेट अप करताना तयार केलेल्या सुरक्षा प्रश्नाचे उत्तर देखील देऊ शकता.
6. तुम्हाला रिकव्हरी कोड मिळाल्यावर, तो Gmail मध्ये टाका आणि मग Google तुम्हाला पासवर्ड बदलण्यास सांगेल.
7. साइन इन केल्यानंतर, Gmail तुम्हाला एक-वेळ सुरक्षा तपासणीसाठी विचारेल. लक्षात ठेवा की, सुरक्षा तपासा आणि नंतर तुमची सुरक्षा माहिती बदला.