सॅमसंगचा दही सेट करणारा रेफ्रिजरेटर; जाणून घ्या आणखी काही जबरदस्त वैशिष्ट्ये

सॅमसंगने लोकप्रिय कर्ड मेस्ट्रो आणि डिजी टच कूल रेफ्रिजरेटर्सची नवीन 2022 आवृत्ती लाँच करण्याची घोषणा केली आहे.

Updated: Jun 16, 2022, 02:23 PM IST
सॅमसंगचा दही सेट करणारा रेफ्रिजरेटर; जाणून घ्या आणखी काही जबरदस्त वैशिष्ट्ये title=

Samsung Curd Maestro: सॅमसंगने लोकप्रिय कर्ड मेस्ट्रो आणि डिजी टच कूल रेफ्रिजरेटर्सची नवीन 2022 आवृत्ती लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा फ्रीज भारतीय कुटुंबियांना समोर ठेवून तयार केला आहे. या फ्रिजच्या माध्यमातून दही तयार करणं सोपं होणार आहे. अन्न योग्य ठेवण्याबरोबरच रेफ्रिजरेटरमध्ये दही सेट करता येणार आहे. दही सेट करणारा जगातील पहिला Curd Maestro रेफ्रिजरेटर Bouquet Silver आणि Midnight Blossom डिझाइनमध्ये उपलब्ध असेल. चला जाणून घेऊया सॅमसंग कर्ड मेस्ट्रो आणि डिजी टच कूल रेफ्रिजरेटर बद्दल...

टचवर आधारित रेफ्रिजरेटर

अधिक स्टोरेज स्पेस आणि सुविधा देणारा हा रेफ्रिजरेटर्स पेटंट केलेल्या DigiTouch Cool 5-in-1 तंत्रज्ञानासह आहे. ग्राहक फ्रीजचा दरवाजा न उघडता फक्त टचस्क्रिनद्वारे रेफ्रिजरेटरच्या आतील सेटिंग्ज बदलू शकतो. यामुळे फ्रिजमधील कूलिंग तशीच राहील आणि विजेची बचत होईल.  

सॅमसंग कर्ड मेस्ट्रो आणि डिजी-टच कूल रेफ्रिजरेटरची किंमत

कर्ड मेस्ट्रो आणि डिजी टच कूल रेफ्रिजरेटर 2022 हा सर्व रिटेल चॅनेल आणि सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोअर उपलब्ध असेल. डिजी टच कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटरची किंमत 18,690 रुपयांपासून सुरू होईल आणि कर्ड मेस्ट्रो फ्रॉस्ट फ्री श्रेणी 27,990 रुपयांपासून सुरू होईल.

दही लवकर जमवण्याची क्षमता

दही हा भारतीय कुटुंबातील एक अत्यावश्यक खाद्यपदार्थ आहे. परंतु दही जमवणे हे एक क्लिष्ट, वेळखाऊ आणि अवघड काम आहे.दही हाताने सेट करताना दूध उकळवावे लागते. नंतर थंड झाल्यावर ते दह्यामध्ये मिसळावे लागते. या रेफ्रिजरेटमुळे दही जमवणं सोपं होईल. फ्रिजमध्ये पातळ दही 6.5 तासात, तर 7.5 तासात घट्ट दही जमा होते. हा फ्रिज किण्वन म्हणजेच दही स्वतः सेट करतो. 

डिजी-टच कूल फ्रिजमधील पाच आकर्षक वैशिष्ट्ये

Temperature Setting - आपण आपल्या रेफ्रिजरेटरचे तापमान हंगामानुसार सहजपणे बदलू शकता. बदलत्या ऋतूंनुसार शक्य तितक्या चांगल्या प्रकारे अन्न टिकवता येते.

Power Cool - सॅमसंग डिजी टच कूल 5-इन-1 रेफ्रिजरेटरमधील पॉवर कूल बटण 53% वेगाने बर्फ गोठवतो आणि 33% वेगाने थंड होते. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा लगेच थंड करणे किंवा बर्फ गोठवणे हा एक सोयीस्कर मार्ग आहे.

Eco Mode - इको मोड फंक्शन रेफ्रिजरेटरचे तापमान सुमारे 6 डिग्री सेल्सिअसवर स्थिर करते. यामुळे 28% विजेची बचत होते. हिवाळ्यात, रात्रीच्या वेळी आवश्यकता नसताना रेफ्रिजरेटर विजेची बचत करतो.

Blackout Notification - वीज गेल्यावर रेफ्रिजरेटरचे तापमान 9 डिग्री सेल्सिअसच्या वर वाढल्यास, ब्लॅकआउट नोटिफिकेशन वैशिष्ट्य टच पॅनेलवरील चमकणाऱ्या प्रकाशाद्वारे सूचित करते. त्याचबरोबर रेफ्रिजरेटर ऑटो एक्स्प्रेस कूलिंगवर जातो. त्यामुळे अन्नधान्य खराब होत नाही.

E-Defrost- या बिल्ट-इन वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते ई-डीफ्रॉस्ट बटण 3 सेकंद दाबून फ्रीजर डीफ्रॉस्ट करू शकतात.