ही आहे जगातली सर्वात वेगवान कार, केला हा रेकॉर्ड

सुपरकार तयार करणारी स्विडीश कंपनी Koenigsegg ची सुपरकार Agera RS ने स्पीडचा नवा रेकॉर्ड केलाय. Koenigsegg Agera RS ही कार जगातली सर्वात वेगवान कार बनली आहे.

Updated: Nov 7, 2017, 01:40 PM IST
ही आहे जगातली सर्वात वेगवान कार, केला हा रेकॉर्ड title=
Image Credit www.topgear.com

नवी दिल्ली : सुपरकार तयार करणारी स्विडीश कंपनी Koenigsegg ची सुपरकार Agera RS ने स्पीडचा नवा रेकॉर्ड केलाय. Koenigsegg Agera RS ही कार जगातली सर्वात वेगवान कार बनली आहे.

या सुपरकारने ४४७ किमी प्रति तासाच्या वेगाने स्पीड पकडून हा रेकॉर्ड कायम केलाय. 

या नव्या रेकॉर्डसोबतच Koenigsegg Agera RS सुपरकार ने Bugatti Veyron Super Sport या सुपरकारचा २०१० चा रेकॉर्ड तोडला आहे. बुगातीच्या या सुपरकारने ४३१ किमी प्रति तासाच्या स्पीडने वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. इतकेच नाहीतर बुगातीची एक दुसरी सुपरकार Chiron सुद्धा ४२० किमी प्रति तासाच्या स्पीडपर्यंत पोहोचली होती. 

Koenigsegg चा दावा आहे की, Agera RS ही जगातली सर्वात वेगवान रोड लीगल कार झाली आहे. या सुपरकारने ० ते ४०० किमी प्रति तासाचा स्पीड पकडण्यासाठी आणि पुन्हा ० किमी प्रति तासवर येण्यासाठे एकूण ३६.४ सेकंदाचा वेळ घेतला.