हा स्मार्टफोन २२ भाषांना करणार सपोर्ट

चीनी स्मार्ट फोन कंपनी लेफोनने त्याचा नवा फोन लॉन्च केला आहे.

Updated: Oct 17, 2017, 03:31 PM IST
हा स्मार्टफोन २२ भाषांना करणार सपोर्ट  title=

मुंबई : चीनी स्मार्ट फोन कंपनी लेफोनने त्याचा नवा फोन लॉन्च केला आहे.

लेफोन डब्ल्यू 15 हा फोन भारतामध्येही उपलब्ध करण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत ५४९९ रूपये आहे. कंपनीनी केलेल्या दाव्यानुसार हा  फोनमध्ये २२ भाषांमध्ये काम करू शकणार आहेत. 

लेफोन फोन चार रंगांमध्ये उपलब्ध आहेत. गुलाबी, सोनेरी, चंदेरी आणि लाल रंगांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनमध्ये दोन सीम एकत्र काम करू शकतात. 
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर हा फोन उपलब्ध होणार आहे. 

लेफोनचे फीचर्स काय ? 

मेमरी 
लेफोन फोनमध्ये  1.3 गीगाहर्टजचा क्वैड कोर प्रोसेसर, 2GB रैम, 16 GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डसाठी स्लॉट आहे. 

बॅटरी आणि कॅमेरा 
या डिवाईसमध्ये 2,000 mAh बॅटरी आहे. सोबतच एलईडी फ्लॅशचा 8 MP चा रियर कॅमेरा आहे. फोन मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनला VoLTE सपोर्ट आहे. 

कोणत्या भाषांना सपोर्ट करणार ? 
लेफोन हिन्दी, आसामी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड़, मल्याळम, मराठी, तमिल, नेपाली, बोडो, तेलुगु, उर्दू, सिंधी, ओडिया, संस्कृत, कश्मीरी, डोगरी, मैथिली आणि मणिपुरी भाषांना सपोर्ट करतो.