नवी दिल्ली : Mahindra ने आपली मोस्ट अवेटेड कार XUV 700 ला जगासमोर आणली अन् विशेष फीचर्समुळे ती लोकांच्या पसंतीस उतरली आहे. हाय क्लास परफॉर्मन्स आणि फर्स्ट क्लास कंफर्टने सर्वाचे हृदय जिंकलंय. जाणून घेऊया त्याविषयी
वॉइस कमांडवर चालणारी कार
Mahindra XUV 700 ही पहिली अशी कार असणार आहे. जी Alexa Voice आर्टिफिशिअल इंटेलिजंन्सला सपोर्ट करेल. या 7 सीटर SUV कारमध्ये AdrenoX AI सिस्टिम असणार आहे. ही सिस्टम Alexa सोबत कनेक्ट करून वॉइस कमांड देईल. एवढेच नाही तर कंपनीने यामध्ये AdrenoX हे विशेष फीचरही दिले आहे. त्यामुळे गरजेनुसार ड्राइविंग मोडला बदलता येईल.
21 वर्षानंतर नवीन लोगो
Mahindra XUV 700 ही महिंद्रा ऍंड महिंद्रा ग्रुपची अशी पहिली SUV आहे. ज्यावर महिंद्राचा नवीन लोगो असेल. कंपनीने नुकते SUV सेगमेंटसाठी नवीन लोगो लॉंच केला आहे. कंपनीने 21 वर्षानंतर आपला लोगो बदलला आहे.
विशेष फीचर
Mahindra XUV 700 या कारची स्पीड 80 च्या वर गेल्यास ऑटोमॅटिक हेडलॅंपचा प्रकाश जास्त वाढतो. जेणे करून चालकाला कार चालवणे आणखी सोपे होते.