Maruti CNG Car Launch: गेल्या काही महिन्यांपासून कारप्रेमींची मारुति सुझुकीच्या नव्या गाडीबाबत उत्सुकता होती. कंपनीने नुकतीच Alto K10 बाजारात आणली होती. आता कंपनीने नवीन Alto K10 S-CNG लाँच केली आहे. कंपनीने अल्टो K10 मध्ये कंपनी फिट केलेले सीएनजी किट जोडण्याव्यतिरिक्त कोणतेही मोठे बदल केलेले नाहीत. मारुति अल्टो गेल्या 16 वर्षांपासून देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे आणि अल्टो K10 चे सीएनजी प्रकार आल्याने विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ऑल न्यू अल्टो K10 S-CNG ला नेक्स्ट-जेन- के सीरीज 1.0L ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन मिळते. सीएनजी मोडमध्ये, हे इंजिन 41.7kW@5300RPM ची पीक पॉवर आणि 82.1Nm@3400RPM कमाल टॉर्क जनरेट करू शकते. हा 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध करून देण्यात आला आहे. अल्टो K10 S-CNG 33.85 किमी/किलो मायलेज देऊ शकते, असा कंपनीने दावा केला आहे.
नवीन Alto K10 CNG लाँच केल्यामुळे कंपनी पोर्टफोलिओमध्ये एकूण 13 S-CNG मॉडेल्स आहेत. यामध्ये Alto, Alto K10, S-Presso, WagonR, Eeco, Celerio, Swift, Dzire, Ertiga, Baleno, XL6, Super Carry आणि Tour S यांचा समावेश आहे.2022 मारुती अल्टो K10 चार मॅन्युअल आणि दोन AMT प्रकार आहेत. यामध्ये Std, LXi, VXi आणि VXi+ मॅन्युअल प्रकार आहेत. या गाड्यांची किंमत अनुक्रमे रु. 3.99 लाख, रु. 4.82 लाख, रु. 5.00 लाख आणि रु. 5.34 लाख आहे. तर, VXi AMT मॉडेलची किंमत रु. 5.50 लाख आहे. VXi+ AMT प्रकारची किंमत रु. 5.84 लाख आहे. सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. आता यामध्ये VXi CNG व्हेरियंटचाही समावेश झाला आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत 5.94 लाख रुपये इतकी आहे.
सीएनजी व्हेरियंटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 2-DIN स्मार्टप्ले ऑडिओ सिस्टम, 2 स्पीकर, इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर अनलॉक, सेंट्रल लॉकिंग, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक, मॅन्युअल अॅडजस्टेबल विंग मिरर, AUX आणि USB पोर्ट, फ्रंट पॉवर वैशिष्ट्ये आहेत. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव म्हणाले की, कंपनीने आतापर्यंत 10 लाखाहून अधिक S-CNG वाहनांची विक्री केली आहे.