7 सीटरच्या स्वरूपात उपलब्ध होणार व्हॅगनारचं नवं मॉडेल

मारुती सुझुकीचीच्या लोकप्रिय गाड्यांमध्ये वॅगनार हे मॉडेल आहे.  

Updated: Mar 28, 2018, 03:10 PM IST
 7 सीटरच्या स्वरूपात उपलब्ध होणार व्हॅगनारचं नवं मॉडेल  title=

मुंबई : मारुती सुझुकीचीच्या लोकप्रिय गाड्यांमध्ये वॅगनार हे मॉडेल आहे. लवकरच वॅगनार-आर हे नवं मॉडल ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. दिसण्यामध्ये वॅगनारचं हे मॉडेल थोडं हटके आहे. गाडीमध्ये आसनव्यवस्थादेखील 7 सीटर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या फेस्टीव्ह सिझनमध्ये ही गाडी ग्राहकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या वॅगनारमध्ये केवळ 5 व्यक्ती बसू शकतात. 

कसे आहे इंजिन? 

नव्या वॅगनार आरमध्ये 1.2 लीटरच्या सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन आहे. 
3 सिलेंडरवाले इंजिन 84BHP च्या पावरसह 115 nm  टॉर्क जनरेट होते. 
5 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिल ट्रान्समिशन अशा दोन्ही स्वरूपात ही कार उपलब्ध आहे.  
नव्या वॅगनारमध्ये सीएनजीचा ऑप्शन आहे. 

3 वेरिएंटमध्ये होणार लॉन्च  

मारुती वेगनार आर तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. हे तीन व्हेरिएंट R बेस, R टॉप आणि R CNG या स्वरूपात उपलब्ध होऊ शकते. याशिवाय काही बाजारात वॅगनार सीएनजी आणि एलपीजी फ्यूल मोडचा पर्याय मिळणार आहे.  

 

काय असेल किंमत? 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपानी या कारला ऑगस्ट महिन्यात लॉन्च करण्याची शक्यता आहे. सुरूवातीच्या टप्प्यात या कारची किंमत सुमारे 5.2 लाख असेल. 

काय असतील फीचर्स ? 

वॅगनार आर मध्ये 7 जणांसाठी आसनव्यवस्था असेल.  

की-लेस एन्ट्रीसोबत सेंट्रल लॉकिंग, सिक्युरिटी अलार्म, ड्युएल टोन डॅशबॉर्ड, ब्लूटुथसोबत डबल डिन स्टिरिओ, प्रिमियम सीट फॅब्रिकसोबतच रिअर पॉवर विंडो असेल. 

नव्या स्वरूपातील वॅगनारमध्येही गाडीचा फ्रंट आणि बॅक भाग जुन्या गाडीप्रमाणेच असेल. लांबी थोडी जास्त असेल.  

नव्या वॅगनारमध्ये 14 इंचचे अलॉय व्हिल, रेग्युलर हॅलोजन हेडलॅम्प्स, रूफ रेल्ससाराखी फीचर्स असतील.