E-Scooter : Ola ला टक्कर देण्यासाठी नवी ई-स्कूटर भारतात लॉन्च, इतकी आहे किंमत

भारतात ई-स्कूटरची मागणी वाढत आहे. भारतात आणखी एक इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च झाली आहे.

Updated: Aug 23, 2022, 07:51 PM IST
E-Scooter : Ola ला टक्कर देण्यासाठी नवी ई-स्कूटर भारतात लॉन्च, इतकी आहे किंमत title=

मुंबई : वाढत्या पेट्रोलच्या किंमती पाहता भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वाढत आहे. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक नवीन स्कूटर भारतात लॉन्च करण्यात आली आहे. iVOOMi Energy ने बाजारात आपली नवी इलेक्ट्रिक स्कूटर iVOOMi JeetX लॉन्च केली आहे. ही स्कूटर एका चार्जवर 200 किमी पर्यंत धावते. जी OLA स्कूटरला टक्कर देऊ शकते.

किती आहे किंमत?

iVOOMi ने एका निवेदनात म्हटले आहे की, या स्कूटरची किंमत 99,999 रुपयांपासून सुरू होते. ड्युअल रिमूव्हेबल बॅटरीसह दोन प्रकारांमध्ये ही स्कूटर येते. या दोन्ही प्रकारांची नावे iVOOMi JeetX आणि iVOOMi JeetX180 आहेत. कंपनीचा दावा आहे की JeetX पूर्णपणे चार्ज केल्यावर 90 किलोमीटरची रेंज देते. JeetX 180 ची रेंज एका चार्जवर 180 किमी पर्यंत धावू शकते.

कमाल वेग 70 किमी प्रतितास

JeetX ही एक मजबूत ई-स्कूटर आहे. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI) द्वारे 70 kmph चा टॉप स्पीड प्रमाणित करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इको मोडमध्ये, JeetX प्रति चार्ज 100 किमी पेक्षा जास्त रेंज ऑफर करते, तर रायडर मोडमध्ये ते 90 किमी पेक्षा जास्त रेंज ऑफर करते. दरम्यान, JeetX180 इको मोडमध्ये 200 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 180 किमी पेक्षा जास्त अंतर व्यापते.

काय आहेत खास वैशिष्ट्ये 

ई-स्कूटर ड्रायव्हिंग करताना मोड बदलण्यास 'इझी शिफ्ट' सारख्या नवीन वैशिष्टे देण्यात आले आहे; एक सोयीस्कर आणि सुरक्षित रिव्हर्स गियर; उत्तम सुरक्षिततेसाठी कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीमसह डिस्क ब्रेक, जे अचानक ब्रेकिंगचा प्रभाव कमी करते आणि थांबण्याची वेळ कमी करते, टचलेस फूटरेस्ट देखील आहे जे वाकल्याशिवाय बाहेर काढले जाऊ शकते आणि हाताने ढकलले जाऊ शकते. शिवाय, iVOOMi JeetX 3 वर्षांच्या वॉरंटीसह येते.

प्रीमियम लुक

स्कार्लेट रेड, इंक ब्लू, पॉश व्हाइट आणि स्पेस ग्रे या चार मॅट रंगांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध असेल.तुम्ही कंपनीच्या डीलरशिपवर iVoomi JeetX बुक करू शकता. त्याची किंमत 1 लाख ते 1.4 लाख रुपयांपर्यंत आहे. JeetX चे बुकिंग 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. कंपनी 10 सप्टेंबर 2022 पर्यंत लवकर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज देखील देत आहे.