हाईकने लॉन्च केले नवीन फिचर

मेसेजिंग अॅप हाईकने आपल्या यूजर्ससाठी वॉलेट हे नवीन फिचर अॅड केले आहे. हे फिचर जोडून हाईकने त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी व्हॉट्सअॅपलाही मात दिली आहे. व्हॉट्सअॅप सध्या वॉलेट फिचर अॅड करण्यासाठी काम करत आहे.

Updated: Jun 21, 2017, 07:01 PM IST
हाईकने लॉन्च केले नवीन फिचर

मुंबई : मेसेजिंग अॅप हाईकने आपल्या यूजर्ससाठी वॉलेट हे नवीन फिचर अॅड केले आहे. हे फिचर जोडून हाईकने त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी व्हॉट्सअॅपलाही मात दिली आहे. व्हॉट्सअॅप सध्या वॉलेट फिचर अॅड करण्यासाठी काम करत आहे.

हाईकने हे फिचर येस बॅंकसोबत मिळून लॉन्च केला आहे. हे फिचर गव्हर्नमेन्ट बॅक युनिफाइड पेमेंट इंटरफेसवर आधारित आहे. हे फिचर हाईकच्या ५.० व्हर्जनवर उपलब्ध असणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, १०० मिलियन यूजर्ससोबत यूपीआयवर आधारित हाईक भारतातील सर्वात मोठी प्लॅटफॉर्म बनलेला अॅप आहे.

या फिचरच्या मदतीने यूजर्स आरामात पैसे ट्रान्सफर करू शकतात. यूजर्स याचा वापर प्रीपेड रिचार्ज आणि पोस्टपेड बिलचे पेमेंट करू शकतील. सध्या यूजर्स हाईकद्वारे एका बॅंकेतून दूसऱ्या बॅंकेत पैसे ट्रान्सफर करू शकतात.

या अॅपमध्ये दूसरे नवीन फीचर्स जोडले गेले आहेत. आता हाईक यूजर्सना मॅजिक सेल्फी सोबत ११ नवीन थीम्सपण पाहायला मिळणार आहे. हाईकने अॅपची साईज कमी करून २५ एमबी केली आहे. कंपनीचे सीईओ कविन भारती मित्तल यांनी सांगितले की, हाईकच्या इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा अपडेट आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x