नोकियाचा फोन फक्त 5 हजार रुपयात, एकदा चार्ज केला की 26 दिवस 'नो टेन्शन'

नोकियाच्या फोनबाबत आजही उत्सुकता कायम आहे. कारण नोकिया फोनची बॅटरी जास्त काळ टिकते, असा मोबाईलप्रेमींना अनुभव आहे.

Updated: Aug 8, 2022, 01:52 PM IST
नोकियाचा फोन फक्त 5 हजार रुपयात, एकदा चार्ज केला की 26 दिवस 'नो टेन्शन' title=

Nokia 2660 Flip: नोकियाच्या फोनबाबत आजही उत्सुकता कायम आहे. कारण नोकिया फोनची बॅटरी जास्त काळ टिकते, असा मोबाईलप्रेमींना अनुभव आहे. HMD Global कंपनी नोकिया ब्रांडचे नवे मोबाईल तयार करते आणि विक्री करते. या कंपनीने चीनी बाजारात एक नवं डिव्हाईस लाँच केलं आहे. या फोनचं 'नोकिया 2660 फ्लिप' फोन असं नाव ठेवण्यात आलं आहे. या फोनच्या नावावरून कळतं की, फ्लिप क्लॅमसेल डिझाईनसह आहे. या फोनची किंमत 5,888 रुपये इतकी आहे. पण सध्या 5,012 रुपयांना विकला जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनबद्दल..

नोकिया 2660 फ्लिप फोनचे स्पेसिफिकेशन

नोकिया 2660 फ्लिपमध्ये 240 x 320 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 2.8-इंचाचा QVGA डिस्प्ले आहे. फोनच्या मागील बाजूस 120 x 160 पिक्सेल स्क्रीन रिझोल्यूशनसह 1.77-इंच दुय्यम QQVGA डिस्प्ले देखील आहे. डिव्हाइस Unisoc T107 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि 48MB RAM आणि 128MB अंतर्गत मेमरीसह आहे. 0.3-मेगापिक्सेल किंवा VGA कॅमेरा सेन्सर आणि LED फ्लॅश देखील आहे.

नोकिया 2660 फ्लिप फीचर्स

कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ब्लूटूथ 4.2 सह डुअल सिम सपोर्ट दिला आहे. यात 3.5mm हेडफोन जॅक आणि मायक्रो USB पोर्ट आहे. सॉफ्टवेअर विभागात, ICE इमर्जन्सी कॉल सिस्टमसह एक्सेसिबिलिटी मोडला सपोर्ट करतो. नोकिया 2660 फ्लिप 18.9 मिमी × 108मिमी × 55मिमी आणि वजन 123 ग्रॅम आहे. नोकिया 2660 फ्लिपमध्ये 2.75-वॅट  काढता येण्याजोग्या बॅटरी आहे. कंपनीच्या मते, 20 तासांपर्यंत बॅटरी लाइफ आणि 26.6 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम देते.