नोकिया स्मार्टफोनच्या किंमतीत घट

 नोकिया ७.१ ला भारतात १९ हजार ९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आले होते. 

Updated: Jan 29, 2019, 02:34 PM IST
नोकिया स्मार्टफोनच्या किंमतीत घट title=

नवी दिल्ली : नोकिया स्मार्टफोनच्या किमतीत मोठी घट झाली आहे. नोकिया कंपनीने नोकिया ३.१, नोकिया ५.१, नोकिया ६.१ या स्मार्टफोनच्या किमती कमी केल्या आहेत. तुम्ही नोकिया कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर ही चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर नोकियाच्या या स्मार्टफोनला आधीच्या किंमतीत विकले जात आहे. परंतु, नोकिया कंपनीच्या Nokia.com या वेबसाइटवर या स्मार्टफोनची कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे. 

किती रुपयांनी झाली घट 
नोकिया ३.१ हा स्मार्टफोन १० हजार ४९९ रुपयांना लॉन्च केला होता. परंतु, नोकियाच्या वेबसाइटवर या स्मार्टफोनला केवळ ८ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येणार आहे. नोकिया ५.१ या स्मार्टफोनची १० हजार ९९९ रुपयांत नोकियाच्या वेबसाइटवर विक्री केली जात आहे. तसेच, नोकिया ६.१ स्मार्टफोनची (३ जीबी रॅम/ ३२ जीबी स्टोअरेज) किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. 

याआधी नोकिया कंपनीने नोकिया ७.१, नोकिया ३.१ प्लस या स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या होत्या. नोकिया ७.१ स्मार्टफोनची किंमत १ हजार रुपयांनी कमी केली होती. नोकिया ३.१ स्मार्टफोनच्या किंमतीतदेखील १ हजार ५०० रुपयांची घट केली होती. नोकिया ७.१ ला भारतात १९ हजार ९९९ रुपयांत लॉन्च करण्यात आले होते.