मुंबई : 'यूआयडीएआय'नं काही दिवसांपूर्वी MAADHAAR हे मोबाईल ऍप लॉन्च केलं. या ऍपच्या सहाय्यानं तुम्ही तुमच्या आधार डिटेल्स सुरक्षित तर ठेऊ शकतातच परंतु, हा डाटा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येही पाहू शकता. यामुळे तुम्हाला कुठेही जाताना आधार कार्ड सोबत घेऊन फिरण्याची गरज लागणार नाही. या ऍपमध्ये आधारकार्ड धारकाचं रजिस्टर्ड नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि फोटो अशी सगळी माहिती दिसू शकते. याशिवाय कार्डधारकांना आपल्या पत्त्यात काही बदल करायचा असल्यास तसंच ऑफलाईन केवासी आणि बायोमॅट्रिक ऑथन्टिकेशन अस्थायी रुपात बंद करण्यासाठी हे ऍप वापरता येऊ शकतं. या सगळ्या सुविधांशिवाय आता याच ऍपमध्ये युझर्स आपलं हरवलेलं आधारकार्ड रिप्रिन्टही करू शकतील.
- तुमचं आधार कार्ड हरवलं तर आधारला रिप्रिन्ट करण्यासाठी तुम्ही MAADHAAR या ऍपची मदत घेऊ शकाल
- यासाठी तुम्हाला अगोदर MAADHAAR ऍपचं लेटेस्ट व्हर्जन डाऊनलोड करावं लागेल
- यासाठी तुमचा आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक ऍक्टिव्ह असणं आणि बारा अंकी आधार क्रमांक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे
- आपल्या मोबाईलच्या सहाय्यानं MAADHAAR ऍपवर लॉग इन करा
- यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. त्यातील SERVICE (सर्व्हिस) हे ऑप्शन निवडा
- आता, ORDER ADHAAR REPRINT च्या ऑप्शनवर क्लिक करा
- त्यानंतर TERMS AND CONDITION च्या बॉक्सवर क्लिक करून OK वर क्लिक करा
- इथे तुम्हाला दोन ऑप्शन मिळतील... ते म्हणजे REGITERED MOBILE NUMBER आणि UNREGISTERED MOBILE NUMBER
- आधार प्रिन्ट करण्यासाठी यातील एक पर्याय निवडा. तुमचा क्रमांक रजिस्टर्ड केला नसेल तर पहिला ऑप्शन REGITERED MOBILE NUMBER वर क्लिक करा... तुम्हाचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसेल तर दुसरा ऑप्शन UNREGISTERED MOBILE NUMBER निवडा
- त्यानंतर, तुम्ही तुमचा बारा अंकी आधार क्रमांक किंवा व्हर्च्युअल आयडी क्रमांक टाका
- इथे तुम्हाला मोबाईलवर दिसणार कॅप्चा कोडही टाकावा लागेल
- त्यानंतर येणारा ओटीपी (OTP) टाकून प्रक्रिया पूर्ण करा
- तुमच्या रजिस्टर्ड पत्यावर रिप्रिन्ट केलेलं आधार पोहचण्यासाठी तुम्हाला केवळ ५० रुपये चार्ज द्यावा लागेल. १५ दिवसांत हे आधार तुमच्या घरी पोहचेल.