'OnePlus 6' भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

वन प्लसनं त्यांचा बहुचर्चित वनप्लस-६ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.

Updated: May 17, 2018, 06:24 PM IST
'OnePlus 6' भारतात लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स title=

मुंबई : वन प्लसनं त्यांचा बहुचर्चित वनप्लस-६ हा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनचा मुकाबला iPhone X आणि Galaxy S9 Plusसोबत असणार आहे. अॅमेझोनवर वनप्लस-६ हा स्मार्टफोन २१ मेपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. अमेरिकेमध्ये ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत ५२९ डॉलर(जवळपास ३५,८०० रुपये) एवढी ठेवण्यात आली आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत ५७९ डॉलर(जवळपास ३९,२०० रुपये) आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत ६२९ डॉलर(जवळपास ४२,६०० रुपये) एवढी आहे.

वनप्लस-६ चे फिचर्स

- कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शनसह

- १९:९ स्क्रीनसोबत ६.२८ इंचाचा फूल एचडी+ (१०८०X२२८० पिक्सल) डिसप्ले

- अॅन्ड्रॉईड ८.१ ओरियो बेस्ड OxygenOS ५.१

- 2.8GHz स्पीडसोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर

- फास्ट चार्जिंग सपोर्टसह 3,300mAh बॅटरी

- सोनी IMX519 सेन्सरसोबत २० मेगापिक्सल आणि १६ मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे, ऑप्टिकल इमेज स्टेबिलायजेशन, इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलायजेशन, ड्युअल एलईडी फ्लॅश.

- १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा f/2.0 अपर्चर आणि EIS सोबत

- फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेन्सर

- 4G व्होल्ट, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी, ३.५ एमएमचा हेडफोन जॅक