Tata Harrier च्या विक्रीचा नवा विक्रम! विकले या भन्नाट Compact SUV चे एवढे युनिट्स

Tata Harrier Sales Record: मागील 4 वर्षांपासून ऑटोमोबाईल सेक्टरच्या स्पर्धेत टिकून असलेली आणि सातत्यपूर्ण मागणी असलेली गाडी म्हणजे टाटाची हॅरिअर! याच गाडीने आता विक्रीचा नवा विक्रम केला आहे.

Updated: May 19, 2023, 02:47 PM IST
Tata Harrier च्या विक्रीचा नवा विक्रम! विकले या भन्नाट Compact SUV चे एवढे युनिट्स title=
Tata Over 1 Lakh Units Sale

Tata Harrier Sales Record: भारतामधील आघाडीची वाहनविक्रेती कंपनी असलेल्या टाटाच्या (Tata) अनेक गाड्या हा सध्या देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांच्या यादीत आहेत. मात्र त्यातही टाटाच्या हॅरिअरची (Tata Harrier) क्रेझ सर्वाधिक असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. कॉम्पॅक्ट एसयुव्ही प्रकारातील कार अशी हॅरिअरची ओळख आहे. विशेष म्हणजे या कारच्या क्रेझचं रुपांतर खरेदीमध्ये होत असून या कारच्या विक्रीने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. टाटाने ही बाजारात लॉन्च केल्यापासून आजपर्यंत या कारचे तब्बल 1 लाखांहून अधिक युनिट्स विकले गेले आहेत. 

महिन्याला 2 हजार गाड्यांची विक्री

टाटा कंपनीने 2019 साली जानेवारी महिन्यात हॅरिअरचं पहिलं मॉडेल बाजारात आणलं होतं. या गाडीची विक्री सुरु झाल्यानंतर अवघ्या 4 वर्षांमध्ये कंपनीने या गाडीचे तब्बल 1 लाखांहून अधिक युनिट्स विकले आहेत. म्हणजेच अगदी सरासरीचा विचार करायचा झाल्यार दरवर्षी या गाडीचे 25 हजार युनिट्स विकले गेले. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 2 हजारांहून अधिक हॅरिअर विकल्या गेल्या आहेत. टाटा कंपनीची ही कार ओमेगा-आर्क प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. या प्लॅटफॉर्मवर निर्माण करण्यात आलेली टाटाची ही पहिली कार आहे. विशेष म्हणजे टाटाच्या प्रमिअम कार सेगमेंटमधील जॅग्वार लॅण्ड रोव्हर एसयुव्ही गाड्या याच प्लॅटफॉर्मच्या आधारे विकसित केलेल्या टी-8 प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आल्या. रेंज रोव्हरच्या एसयूव्ही कार मॉडलही याच प्लॅटफॉर्मवर बनवल्या जात्या. त्यामुळेच हॅरिअर गाडी ही इतर आलिशान गाड्यांप्रमाणे फारच आकर्षक दिसते.

...म्हणून ही गाडी स्पर्धेत टिकून

परवडणारी मीड रेंज कॉम्पॅक्ट एसयुव्ही म्हणून अल्पावधित तुफान लोकप्रिय झालेल्या हॅरिअरमध्ये कंपनीने वेळोवेळी नवीन अपडेट्स मागील 4 वर्षांमध्ये दिले आङेत. यामध्ये अपडेट्सबरोबर स्पेशल एडिशनही लॉन्च करण्यात आल्या. टाटाने केलेली तुफान मार्केटिंग आणि गाडी जुनी वाटू नये म्हणून वेळोवेळी दिलेले अपडेट्समुळेच कंपनी स्पर्धात्मक वातावरणामध्ये या गाडीची विक्री टिकवून ठेवू शकली. कंपनीने डार्क एडिशन, रेड डार्क एडिशन आणि कॅमो एडिशनसारख्या स्पेशल एडिशन लॉन्च केल्या आहेत. टाटाच्या या गाडीचे तब्बल 19 वेगवेगळे व्हेरिएंट (इंजिन आणि कलर्ससहीत) ग्राहकांना मागील 4 वर्षात उपलब्ध करुन देण्यात आले. 

किंमत किती?

टाटाचं हॅरिअर हे मॉडेल किमान 15 लाखांपासून उपलब्ध आहे. तर गाडीचं टॉप मॉडेल हे 24.07 लाखांना आहे. या किंमती एक्स शोरुम किंमती आहेत. या गाडीमध्ये सुरक्षेसंदर्भातील विशेष फिचर्स, आधुनिक तंत्रज्ञान, आलिशान फिचर्स कंपनीने वेळोवेळी दिले आहेत. टाटाने या सर्वात लोकप्रिय गाडीच्या सुरक्षेची विशेष काळजी घेताना त्यात अ‍ॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स म्हणजेच ADAS फिचर दिलं आहे. कंपनीच्या याच प्रयत्नांना यश आलं असून या गाड्यांची विक्रमी विक्री झाली आहे. आता या निमित्ताने कंपनी काही खास ऑफर देणार की नवीन एखादं व्हेरिएंट लॉन्च करणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.