Paytm, Phonepe, Gpay ने पेमेंट करत असाल तर १ जानेवारीपासून या बदलासाठी तयार राहा

Paytm, Google pay, Phonepe, Jio Pay, Amazon Pay ने पेमेंट करत असाल, तर १ जानेवारी २०२१ पासून काही बदलांसाठी तयारी ठेवावी लागणार आहे.

Updated: Nov 6, 2020, 09:43 PM IST
  Paytm, Phonepe, Gpay ने पेमेंट करत असाल तर  १ जानेवारीपासून या बदलासाठी तयार राहा

मुंबई : Paytm, Google pay, Phonepe, Jio Pay, Amazon Pay ने पेमेंट करत असाल, तर १ जानेवारी २०२१ पासून काही बदलांसाठी तयारी ठेवावी लागणार आहे. १ जानेवारी २०२१ पासून थर्डपार्टी ऐपच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत.  (Third Party App). दरम्यान नॅशनल पेमेंट कॉरपोरेशन ऑफ इंडिया (National Payments Corporation of India) थर्ड पार्टी ऐप प्रोव्हायडर्स (TPAP) वर ३० टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे.

NPCIने हा निर्णय भविष्यात थर्ड पार्टीची मोनोपली थोपवण्यासाठी आणि त्याच्या साईझनुसार मिळणारे विशेष फायदे थांबवण्यासाठी घेतला. NPCIच्या या निर्णयानंतर UPI ट्रान्झॅक्शनमध्ये एकाच पेमेंट ऐपची एकाधिकारशाही संपणार आहे.

NPCI ने माहिती दिली आहे, प्रत्येक महिन्याला २ अब्ज यूपीआय ट्रान्झॅक्शन होत आहेत. प्रत्येक पेमेंट गेटवे आणि बँका या सुविधेचा वापर करीत आहे. यात सामान्य लोकांना मोठा फायदा होत आहे. UPI ट्रॉन्झॅक्शनमध्ये अधिक वेग येण्याची शक्यता आहे. यासाठी NPCI थर्ड पार्टी ऐप ट्रान्झॅक्शनवर लगाम लावण्याचा विचार करीत आहे. १ जानेवारीनंतर ऐप आपल्या टोटल वॉल्यूमच्या जास्तच जास्त ३० टक्केच ट्रान्झॅक्शन करू शकतील.

चेकद्वारे होणारी फसवणूक कमी होणार

तसेच १ जानेवारी २०२१ पासून चेक देऊन होणारी फसवणूक थांबवण्यासाठी नवीन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. पण आता रक्कम जर ५ लाखांपेक्षा जास्त असेल तर चेक पॉझिटिव्ह पे चेकनेच क्लिअर केली जाईल. चेक देताना ग्राहकच चेक ज्याला दिला जाणार आहे त्याची माहिती देणार आहे. चेक देणारा आणि चेक ज्याला हवा आहे, अशा दोन्ही जणांची माहिती योग्य ठरल्यानंतरच बँक चेक क्लिअर करणार आहे.

ग्राहक SMS, ATM, मोबाइल ऐप द्वारा चेक लिहिल्याची माहिती देऊ शकतील. बँकांना ५० हजारावरील रकमेवर ही सुविधा द्यावी लागणार आहे. खरंतर भारतीय रिझर्व बैंक (RBI) ने बँकिंग व्यवहारात होणारी फसवणूक थांबवण्यासाठी  Positive pay cheque सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार ५० हजाराच्या वरील चेकवर दोन वेळेस खात्री केली जाणार आहे.