Paytm पुरविणार फूड ऑर्डर सेवा!

पेटीएम युजर्सच्या प्रमाणात आणखी भर पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे'. 

Updated: Jan 18, 2019, 12:18 PM IST
Paytm पुरविणार फूड ऑर्डर सेवा! title=

नवी दिल्ली - डिजिटल व्यवहार करणाऱ्या पेटीएम कंपनीने नवीन सेवा देण्याचे ठरविले आहे. पेटीएम ऍपच्या माध्यमातून केवळ पैशांची देवाण-घेवाण केली जात असे. परंतु पेटीएमच्या नव्या सेवेमुळे पेटीएम युजर्सला फूड ऑर्डर करता येणार आहे. पेटीएम कंपनीने बाजारात फूड सेवा पुरवणारी झोमॅटो कंपनीशी भागिदारी केली. तसेच पेटीएमच्या ऍपवर या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ही सेवा दिल्ली- एनसीआरच्या ग्राहकांसाठी पेटीएमच्या ऍन्ड्राइड ऍपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लवकरच ही सेवा संपूर्ण भारतात कार्यरत होणार आहे. 

पेटीएम कंपनीने सांगितले की, 'पेटीएम ऍपच्या माध्यमातून पैशांची देवाण- घेवाण अगदी सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते. या कारणाने पेटीएम ऍप वापरकर्त्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. नोटाबंदीच्या काळात पेटीएमने लोकांना योग्य सेवा प्रदान केल्यामुळे पेटीएम ऍपने आपल्या युजर्सकडून चांगलीच पसंती मिळवली होती. तसेच या नवीन फिचरमुळे पेटीएम युजर्सच्या प्रमाणात आणखी भर पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे'. 

माहितीनुसार, झोमॅटो कंपनी केवळ १०० शहरांत, ८० हजारांपेक्षा अधिक हॉटेलमधून फूड सेवा प्रदान करते. कंपनीने मागच्या महिन्यात २ कोटी ८० लाखाची फूड डिलिव्हरी केली होती. संपूर्ण भारतात १ लाख ५० हजार डिलिव्हरी कामगार आहेत. जे ग्राहकांनी केलेल्या ऑर्डरची डिलिव्हरी करतात.