Waterproof Smartphones: पावसात सर्वाधिक टेन्शन असतं ते स्मार्टफोनचं. पाऊस असो वा ऊन कामासाठी घराबाहेर तर निघावंच लागतं. पावसात फोन सुरक्षित ठेवण्यासाठी लोक फॉइल किंवा पाऊच सोबत ठेवतात. काही वेळा आपण काळजी घेतली तरी फोन मात्र ओला होऊन खराब होतोच. अशावेळी तुमचा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असणे आवश्यक आहे.
तुमचा फोन वॉटरप्रूफ आहे की नाही हे तुम्ही कसे तपासू शकता आणि कोणते आयपी रेटिंग फोनला पाण्यापासून सुरक्षित ठेवू शकते हे आम्ही तुम्हाला सांगू.
पावसात भिजून स्मार्टफोन खराब होऊ शकतो!
स्मार्टफोनला पावसापासून दूर ठेवण्यासाठी फोन वॉटरप्रूफ असणे आवश्यक आहे. आजच्या काळात, जवळजवळ प्रत्येक फोन वॉटरप्रूफ असल्याचे म्हटले जाते परंतु त्याबद्दल अनेक रेटिंग आहेत. ज्याचा अर्थ देखील भिन्न आहे. फोनमधील रेटिंग काय आहेत? कोणते IP रेटिंग सर्वोत्तम आहे? आणि कोणते रेटिंग तुमचा फोन पावसापासून पूर्णपणे सुरक्षित ठेवू शकते?
फोन वॉटरप्रूफ आहे की नाही हे जाणून घ्या
स्मार्टफोन वॉटरप्रूफ असल्याचे सांगण्यासाठी एक रेटिंग वापरली जाते. ज्याला IP (Ingress Protection) रेटिंग असे नाव दिले जाते. IP रेटिंग एक ते सहा पर्यंत असते. रेटिंग जितके जास्त असेल तितका तुमचा फोन पाण्यापासून संरक्षित असेल. जर तुमच्या फोनला IPXX रेटिंग मिळालेली असेल म्हणजे तुमचा फोन वॉटरप्रूफ नसेल. तर IPX8 रेटिंग असलेले फोन वॉटरप्रूफ आहेत पण डस्टप्रूफ नाहीत.
वाचा : OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सबस्क्रिप्शन कसं मिळवाल, जाणून घ्या
हे आयपी रेटिंग असलेले फोन सर्वोत्तम आहेत
जर तुमचा फोन IP68 रेटिंगने सुसज्ज असेल तर तो वॉटरप्रूफ तसेच डस्टप्रूफ आहे. म्हणजेच फोन किमान 30 मिनिटे एक मीटर खोल पाण्यात सुरक्षित राहू शकतो.