Realme C35 भारतात 7 मार्चला होतोय लॉन्च, कमी बजेटमध्ये भरपूर फीचर्स

Realme C35 कंपनीने गेल्या महिन्यात थायलंडमध्ये लॉन्च केला होता. येथे या फोनची किंमत 5,799 THB आहे. पाहा भारतात याची किंमत किती असेल.

Updated: Mar 5, 2022, 06:55 PM IST
Realme C35 भारतात 7 मार्चला होतोय लॉन्च, कमी बजेटमध्ये भरपूर फीचर्स title=

मुंबई : Realme ची सी-सीरीज एक बजेट लाइनअप आहे, जेथे कंपनी 11,000 रुपयांच्या बजेटमध्ये डिव्हाइस ऑफर करते. आता या मालिकेत एक नवीन स्मार्टफोन - Realme C35 येत आहे. भारतात 7 मार्च 2022 रोजी हा फोन लॉन्च होणार आहे. दुपारी 12:30 वाजता हा फोन लॉन्च होणार आहे.

रियालिटीने या स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सबद्दलही सांगितले आहे. डिव्हाइसमध्ये 2408 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंच फुल एचडी स्क्रीन, 90.7 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशो आणि 600 निट्स पीक ब्राइटनेस असेल. 

या फोनमध्ये सुपर पॉवर सेव्हिंग मोड देखील उपलब्ध असेल, जो बॅटरीचे लाईफ वाढवण्याचा दावा करतो. कंपनीने असेही म्हटले आहे की, हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल आणि त्यात साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील असेल.

Realme C35 किंमत आणि फीचर

Realme C35 हा फोन कंपनीने गेल्या महिन्यात थायलंडमध्ये लॉन्च केला होता. येथे या फोनची किंमत 5,799 THB आहे, जी भारतीय चलनात सुमारे 13,500 रुपये आहे. भारतातही या फोनची किंमत जवळपास तितकीच असू शकते.

भारतात Realme C35 बद्दल आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीवरून असे दिसते आहे की या डिवाइसच्या भारतीय मॉडेलचे वैशिष्ट्य थायलंड आवृत्ती मॉडेल सारखेच असेल. डिव्हाइस थायलंडमध्ये बनवलेल्या Unisoc T616 प्रोसेसरद्वारे काम करेल. 6GB LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 स्टोरेजसह हा फोन येणार आहे.

फोनच्या मागील बाजूस तीन कॅमेरा सेन्सर आहेत, त्यापैकी एक 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. डिव्हाइसच्या पुढील बाजूस 8MP सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.