नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुति सुझुकीने Maruti Suzuki आपल्या छोट्या कारद्वारे एक नवा रेकॉर्ड New Record केला आहे. मारुति सुझुकीच्या लोकप्रिय ऑल्टो Alto कारने विक्रीचा रेकॉर्ड केला आहे. मारुति सुझुकीने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, ऑल्टोची विक्री 40 लाख यूनिट्सवर गेली असून यासह ऑल्टो भारतात 40 लाखांहून अधिक गाड्यांची विक्री करणारी पहिली कार ठरली आहे.
20 वर्षांपूर्वी मारुतिने लॉन्च केली होती ऑल्टो
मारुतिची ही छोटी कार 20 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आली होती. जी 16 वर्षांपासून भारतात टॉप-सेलिंग म्हणजेच सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. मारुति ऑल्टोने 2008 मध्ये 10 लाख यूनिट्स विक्रीचा आकडा पार केला होता. 2012 मध्ये 20 लाख यूनिट्स आणि 2016 मध्ये 30 लाख यूनिट्सपर्यंत विक्री पोहचली होती. मायलेज आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे या कारने बाजारात आपलं नाव स्थिर ठेवलं आहे.
BS6 नॉर्म्स पूर्ण करणारी पहिली कार
latest crash and pedestrian safety standardsसह BS6 नॉर्म्स पूर्ण करणारी ही देशातील पहिली एन्ट्री लेवल कार ठरली आहे. मारुतिने दिलेल्या माहितीनुसार, '76 टक्के ग्राहक त्यांची पहिली कार म्हणून ऑल्टोची निवड करतात. ऑल्टो भारतीय ग्राहकांच्या पसंतीची कार असून, किंमत परवडणारी असण्याबरोबरच, सोयीस्करही आहे'.
मारुति सुझुकी ऑल्टो पेट्रोलच्या 6 आणि सीएनजीच्या 2 वेरिएन्ट्समध्ये येते. याची एक्स शोरुम किंमत 2.94 लाख ते 4.36 लाखांपर्यंत येते. 800 सीसी इंजिन असणारी ही गाडी BS-6 मानक आणि 3 सिलेंडर पेट्रोल इंजिनसह येते. यात 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्सही आहेत.