'बीएमसी'विरोधात 'रेडएफएम'चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल

आर जे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेनंतर तिच्यावर 'बीएमसी' आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

Updated: Jul 21, 2017, 11:32 AM IST

मुंबई : आर जे मलिष्काने गाण्यातून केलेल्या टीकेनंतर तिच्यावर 'बीएमसी' आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  आता त्यावर मलिष्काच्या रेडिओ स्टेशननं म्हणजेच रेड एफएमनं आणखी एक नवा व्हिडिओ व्हायरल केला आहे. 

या व्हिडिओतून खड्ड्यांच्या स्थितीवर पुन्हा एकदा तिखट भाष्य करण्यात आलं आहे, हा व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत मात्र पहिल्यांदा रेडएफने रेल्वेला सोडलं आहे. यावेळी फक्त बीएमसीवर निशाणा साधला आहे.

रेड एफने फक्त शिवसेनाच नाही, तर दिल्ली महापालिकेवरही निशाणा साधला आहे, या व्हिडीओचं शुटिंग दिल्लीत करण्यात आलं आहे.