'रेडमी नोट 7 प्रो' लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

'रेडमी नोट 7 प्रो' स्मार्टफोन १३ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Updated: Mar 1, 2019, 02:54 PM IST
'रेडमी नोट 7 प्रो' लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स title=

नवी दिल्ली : चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमीने (Xiaomi) 'रेडमी नोट 7 प्रो' स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनला ४८ मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 'रेडमी नोट 7 प्रो'ला रियर कॅमेरामध्ये सोनीचा IMX586 इमेज सेंसरही देण्यात आला आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत जास्त फिचर असणाऱ्या स्मार्टफोनच्या तुलनेत कमी आहे. 'रेडमी नोट 7 प्रो' स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर १३ मार्चपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

काय आहेत 'Redmi Note 7 Pro'ची वैशिष्ट्ये -

- ६.३ इंची एलसीडी एचडी डिस्प्ले
- रिजोल्यूशन २३४०*१०८०
- फ्रंन्ट आणि बॅक Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शन 
- ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर 
- गेमिंगसाठी Adreno 612 GPU ची सुविधा
- ४८ मेगापिक्सल रियर कॅमेरा +  Sony IMX586 इमेज सेंसर + ५ मेगापिक्सल डेप्थ सेंसर
- १३ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- AI डिटेक्शन, AI लाइट ट्रेल, AI पोट्रेट 2.0
- ४ हजार व्हिडिओ रेकॉर्डिंग सपोर्ट
- ४०००mAh बॅटरी
- अॅन्ड्रॉइड ९ पाय बेस्ड MIUI 10 

रेडमी नोट 7 प्रो, Redmi Note 7 Pro, Note 7 Pro, Note 7 Pro price, Note 7 Pro Specifications

४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या 'Redmi Note 7 Pro'ची भारतातील सुरूवातीची किंमत १३,९९९ रूपये इतकी आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या 'Redmi Note 7 Pro'ची किंमत १६,९९९ रूपये आहे. Redmi स्मार्टफोन नवीन  'Aura Design'सह देण्यात आला असून त्यात वॉटरप्रुफ स्टाइल नॉचही देण्यात आला आहे. 'Redmi Note 7 Pro' स्पेस ब्लॅक, नेप्चून ब्लू आणि नेबुला रेड रंगात उपलब्ध करण्यात आला आहे.