अंबानींच्या Reliance Big TVचा धमाका, वर्षभरासाठी एचडी चॅनल्स पाहा मोफत

जबरदस्त ऑफर...

Updated: Jun 11, 2018, 12:54 PM IST
अंबानींच्या Reliance Big TVचा धमाका, वर्षभरासाठी एचडी चॅनल्स पाहा मोफत

नवी दिल्ली : डायरेक्ट टू होम सर्व्हिस प्रोव्हायडर अनिल अंबानी यांच्या रिलायन्स बिग टीव्ही (Reliance Big TV)ने ग्राहकांसाठी एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे. डीटीएच बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना स्पेशल ऑफर मिळणार आहे. रिलायन्स बिग टीव्हीने वर्षभर सेवा मोफत देण्याची घोषणा केली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना HD HEVC सेट-टॉप-बॉक्स मिळणार आहे. या सेट-टॉप-बॉक्समध्ये रेकॉर्डिंग, यूएसबी पोर्ट, एचडीएमआय पोर्ट, रेकॉर्डिंग अँड व्यूइंग सारखे फिचर्स असणार आहेत. यानुसार वर्षभर सर्व चॅनल्स फ्री मिळणार असून यामध्ये एचडी चॅनल्सचाही समावेश आहे.

(हे पण पाहा: Reliance DTH चा धमाका, ५ वर्षांपर्यंत पाहा सर्व चॅनल्स Free)

कंपनीने यासाठी भारतीय पोस्ट ऑफिससोबत करार केला आहे. जर तुम्हाला रिलायन्स बिग टीव्ही कनेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही देशभरातील ५० हजार पोस्ट ऑफिसेसच्या माध्यमातून बुकिंग करु शकता. कनेक्शन बुक करण्यासाठी तुम्हाला ५०० रुपयांचं पेमेंट करावं लागणार आहे. कनेक्शन इंस्टॉलेशनसाठी १,५०० रुपये आणखीन द्यावे लागणार आहेत. यामध्ये ५०० एफटए (फ्री टू एअर) चॅनल्स तुम्ही ५ वर्षांपर्यंत मोफत पाहू शकणार आहात.

लॉयल्टी बोनससाठी ग्राहकांना दुसऱ्या वर्षापासून ३०० रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. असं रिचार्ज दोन वर्षांपर्यंत करावं लागणार आहे. यानंतर सब्सक्रायबर्सला २ हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस मिळणार आहे. म्हणेजच जी रक्कम तुम्ही सुरुवातीला जमा केली होती ती काही काळानंतर तुम्हाला पुन्हा देण्यात येईल. कंपनीतर्फे यासाठी २० जून पासून प्री-बुकिंग सुरु करण्यात येणार आहे.

या ऑफर अंतर्गत राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझारोम, नागालँड आणि सिक्किमच्या ग्राहकांना डीटीएचची प्री-बुकिंग करु शकता. या राज्यातील ग्राहक आपल्या जवळील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन डीटीएच सेवेची बुकिंग करु शकतात.