close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जिओ ग्राहकांसाठी खुशखबर; १०० रुपयांहून कमी किंमतीचे प्लान

१०० रुपयांहून कमी किंमतीच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि मेसेजची सुविधा देण्यात आली आहे.

Updated: Apr 13, 2019, 01:43 PM IST
जिओ ग्राहकांसाठी खुशखबर; १०० रुपयांहून कमी किंमतीचे प्लान

मुंबई : सध्या बाजारात टेलिकॉम कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. कंपन्या आपल्या ग्राहकांना खुश करण्यासाठी काही ना काही नवीन प्लान बाजारात आणत असतात. रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी एका नवीन प्लान आणला आहे. जर तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात आणि छोट्या रिचार्जवाला प्लान घेऊ इच्छिता तर जिओने अशा ग्राहकांसाठी १०० रुपयांहून कमी किंमतीचे प्लान आणले आहे. या १०० रुपयांहून कमी किंमतीच्या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट आणि मेसेजची सुविधा देण्यात आली आहे.

जिओ ग्राहकांसाठी कंपनीकडून १९ रुपयांपासून प्लान देण्यात आला आहे. १९ रुपयांमध्ये एका दिवसांसाठी इंटरनेट, मेसेज आणि अनलिमिटेड प्लान देण्यात आला आहे. १५० एमबी डेटा, कोणत्याही क्रमांकावर अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला २० मेसेज देण्यात आले आहेत. या प्लानची वॅलिडिटी १ दिवस आहे.

एका आठवड्यासाठी कमी किंमतीचा प्लान हवा असल्यास जिओने ७ दिवसांसाठी ५२ रुपयांच्या प्लानची सुविधा देण्यात आली आहे. या प्लानमध्ये ७ दिवसांसाठी १.०५ जीबी इंटरनेट डेटा आणि कोणत्याही नंबरसाठी अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. त्याशिवाय ७० मेसेज देण्यात आले आहेत. ७ दिवस इतकी या प्लानची वैधता आहे. जिओकडून २८ दिवसांसाठी ९८ रुपयांचा प्लान देण्यात आला आहे. या प्लानमध्ये ग्राहक ३०० मेसेज, अनलिमिटेड कॉलिंग आणि २ जीबी इंटरनेट सुविधेचा फायदा घेऊ शकतात.