Reliance Jio Plan : 1 रुपया अधिक देऊन मिळवा 56 जीबी डेटा

 589 आणि 599 रुपयांच्या प्लानमध्ये काय मिळतं ?

Updated: Apr 25, 2021, 03:23 PM IST
Reliance Jio Plan : 1 रुपया अधिक देऊन मिळवा 56 जीबी डेटा  title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने (Relince Jio) एक रुपयात मोठा फायदा देणारा प्लान बाजारात आणलाय. 1 रुपया आणखी देऊन तुम्ही प्लानची वॅलिडीटी 28 दिवसांनी वाढवू शकता. यात तुम्हाला 56GB अधिकचा डेटा मिळणार आहे. टेलिकॉम कंपनीच्या स्पर्धेतील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी Reliance Jio ने खूप सारे प्लान आणलेयत. सध्या जिओचे खूप सारे प्लान्स बाजारात आहेत. पण असे दोन प्लानस् आम्ही तुम्हाला सांगतोय ज्यात केवळ 1 रुपयांचा फरक आहे. पण 1 रुपया जास्त देऊन तुम्हाला काय मिळणार आहे हे समजून घ्या. आधी 589 आणि 599 रुपयांच्या प्लानमध्ये काय मिळतं ? याची माहिती करुन घ्या. 

जिओच्या 598 रुपयांच्या पॅकची वैधता 56 दिवसांची आहे. यात दररोज 2 जीबी डेटा मिळतो. या संपूर्ण पॅकमध्ये 112 जीबी हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे. डेटाची मर्यादा संपताच, तिचा वेग कमी होऊन 64 केबीपीएस होतो.

या प्लानसह अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळतायत. याशिवाय या पॅकमधील जिओ अॅप्सची मेंबरशिप ग्राहकांना मिळते. जिओच्या या योजनेत डिस्ने + हॉटस्टार मेंबररशिप अतिरिक्त शुल्काशिवाय 1 वर्षासाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

जिओच्या 599 रुपयांच्या प्लानची वॅलिडीटी 84 दिवसांची आहे. यात दररोज 2 जीबी डेटा मिळतो. म्हणजे पॅकच्या वॅलिडीटीपर्यंत एकूण 168 जीबी डेटा मिळतो. डेटा मर्यादा संपताच, तिचा स्पीड कमी होऊन 64 केबीपीएस होतो.

या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस देखील मिळतायत. याशिवाय या पॅकमध्ये ग्राहकांना जिओ एप्सची मेंबरशिप मिळते. 

598 रुपयांच्या प्लानमध्ये, केवळ 56 दिवसांची वॅलिडीटी आहे. त्याचवेळी, फक्त 1 रुपया जास्त खर्च करून 599 रुपयांची योजना निवडल्यास, तुम्हाला अवघ्या 28 दिवसांची जास्त वॅलिडीटी मिळेल. तसेच 56 जीबी अधिक डेटा देखील मिळेल. पण लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे 599 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी डिस्ने + हॉटस्टारची सदस्यता मिळणार नाही.