'या' बड्या कंपनीकडून तब्बल 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड मिळणार अगदी मोफत...

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'या' कंपनीची TRUE 5G सेवा सुरु... 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड डेटा मोफत

Updated: Oct 5, 2022, 12:56 PM IST
'या' बड्या कंपनीकडून तब्बल 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड मिळणार अगदी मोफत...  title=

मुंबई : रिलायन्स जिओच्या (Reliance JioTRUE 5G सेवेची बीटा चाचणी आज म्हणजेच दसरा 2022 (Dussehra 2022) पासून सुरू झाली आहे. सध्या देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या चार शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सध्या आमंत्रणावर आहे. म्हणजेच, सध्याच्या Jio यूजर्सपैकी फक्त तेच निवडक वापरकर्ते ही सेवा वापरू शकतील, ज्यांना आमंत्रण पाठवलं जाईल.

यासोबतच, यूजर्सना 'वेलकम-ऑफर' देखील मिळेल, ज्या अंतर्गत यूजर्सना 1Gbps पर्यंत स्पीड आणि अमर्यादित 5G डेटा मिळेल. आमंत्रित यूजर्स Jio TRUE 5G सेवेचा अनुभव घेतील. यानंतर, त्यांच्या अनुभवाच्या आधारे, कंपनी मोठ्या प्रमाणावर 5G सेवा सुरू करेल.

काय आहे Jio TRUE 5G वेलकम ऑफर?

Jio True 5G वेलकम ऑफर दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथील Jio वापरकर्त्यांसाठी आमंत्रणाद्वारे सुरू केली जात आहे. या वापरकर्त्यांना 1 Gbps + पर्यंत स्पीडसह अमर्यादित 5G डेटा मिळेल. शहरातील नेटवर्क कव्हरेज पूर्णपणे मजबूत होईपर्यंत वापरकर्ते या बीटा चाचणीचा लाभ घेऊ शकतील.

जिओ वेलकम ऑफरचे आमंत्रण मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांचं विद्यमान जिओ सिम बदलावं लागणार नाही. यासाठी फक्त त्यांचा मोबाईल 5G असावा. Jio True 5G सेवा त्यांच्या डिव्हाइसवर आपोआप अपग्रेड केली जाईल. यूजर्सकडे निवडण्यासाठी 5G डिव्हाइसेसची रेंज आहे याची खात्री करण्यासाठी Jio सर्व हँडसेट ब्रँडसह काम करत आहे.