जेव्हा उपहारगृहात रोबोट करतात खाद्य पदार्थ सर्व...

इथल्या एका उपहारगृहाने भन्नाट कल्पना राबताना खाद्य पदार्थ सर्व करण्यासाठी चक्क रोबोट ठेवले आहेत. 

Updated: Dec 16, 2017, 09:43 PM IST
जेव्हा उपहारगृहात रोबोट करतात खाद्य पदार्थ सर्व... title=

चेन्नई : इथल्या एका उपहारगृहाने भन्नाट कल्पना राबताना खाद्य पदार्थ सर्व करण्यासाठी चक्क रोबोट ठेवले आहेत. 

वेटरऐवजी रोबोट 

चेन्नईतल्या या उपहारगृहात प्रत्येक टेबलावर एक टॅबलेट आहे. त्यात तुम्हाला तुमची ऑर्डर पंच करायची आहे. त्यातून शेफकडे तुमच्या ऑर्डरचा मेसेज जाईल. त्यानंतर आपल्याला हवा असलेला खाद्य पदार्थ रोबोटद्वारे आपल्या टेबलावर पोहोचवला जाईल. 

वेगळाच अनुभव

उपहारगृहात शिरल्यानंतर तुम्ही तुमच्या टेबलावर बसलात की रोबोट तुमचं स्वागत करतो. या उपहारगृहात चार रोबोट वेटर म्हणून काम करतायेत. या उपहारगृहात जेवण करणं हा एक वेगळाच अनुभव असल्याचं या उपहारगृहाच्या मालकाचं म्हणणं आहे. 

देशातलं पहिलंच उपहारगृह

या उपहारगृहात मुख्यत: चायनीज आणि थाई पदार्थ तयार केले जातात. या प्रकारचं कृत्रीम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापर करून रोबोटचा वापर वेटर म्हणून करणारं हे देशातलं पहिलंच उपहारगृह आहे. रोबोटचा अनुभव घेण्यासाठी ग्राहक इथं गर्दी करता आहेत.