रॉयल एनफिल्डची नवी जबरदस्त बाइक, १० जुलैपासून बुकिंग सुरु

बाइकमधील राजेशाही म्हणून ओळखली जाणारी रॉयल एनफिल्डची नवी बाइक बाजारात दाखल होत आहे.  

Updated: Jun 1, 2018, 07:58 AM IST
रॉयल एनफिल्डची नवी  जबरदस्त बाइक, १० जुलैपासून  बुकिंग सुरु title=

मुंबई : बाइकमधील राजेशाही म्हणून ओळखली जाणारी रॉयल एनफिल्डची नवी बाइक बाजारात दाखल होत आहे. क्लासिक ५०० बुलेट असं या बाइकचे नाव आहे. या बाइकचे बुकिंग १० जुलैपासून सुरु होणार आहे. रॉयल एनफिल्डची पेगासस मॉडेल दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या बाइकची किंमत दोन लाखांच्या घरात आहे. यामधील मिलिट्री ओलिव्ह ग्रीन शेड  भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे की नाही, याबाबत शंका आहे.

ऑनलाईन बुकींग 

रॉयल एनफिल्डने लॉन्च केलेल्या क्लासिक ५०० बुलेटचे नाव पेगासस असे ठेवण्यात आले आहे. ही बुलेट दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश पॅराट्रूपर्सकडून वापरण्यात आलेल्या आरई/डब्ल्यूइ १२५ बाइकवरुन प्रेरित आहे. या बाइकची फ्लाईंग फ्ली म्हणूनही ओळख आहे. दरम्यान, रॉयल एनफिल्डने लॉन्च केलेल्या क्लासिक ५०० बुलेटची किंमत जाहीर करण्यात आली आहे. भारतात या बुलेटची किंमत २.४९ लाख ( महाराष्ट्रात ऑन रोड) आणि २.४० लाख ( दिल्लीत ऑन रोड ) अशी असणार आहे. या बुलेटची ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. १० जुलैपासून ही बुकिंग सुरु होईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आलेय.

दोन रंगात बाइक  

रॉयल एनफिल्डचे जगभरात फक्त एक हजार युनिट्स अणार आहे. त्यामुळे अत्यंत लिमिटेड एडिशन मॉडल असणार आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. यामधील १९० युनिट्स केवळ ब्रिटनमध्ये विकले जाणार आहेत. भारतात एकूण २५० युनिट्स विकले जाणार आहेत. त्यामुळे १० जुलै रोजी जे बुकिंग करतील त्यांनाच या बाइक मिळण्याची शक्यता आहे. पेगासस मॉडेल दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या सर्व क्लासिक ५०० पेगासस (Classic 500 Pegasus) एडिशन बुलेटला युनिक सिरियल नंबर देण्यात येईल, जो फ्यूएल टँकवर असेल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आलेय.

या बाइकची वैशिष्ट्ये -

रॉयल एनफिल्ड क्लासिक ५०० पेगासस लिमिटेड एडिशन मॉडेलमध्ये ४९९ सीसी, एअर कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात येईल. हे इंजिन ५२५० आरपीएमवर २७.२ बीएचपी पॉवर आणि ४००० आरपीएमवर ४१.३ न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करेल. बाइकचा कर्ब वेट १९४ किलोग्राम आहे. सर्व मॉडेल्सवर ब्राऊन हॅण्डलबार ग्रिप्स, लेदर स्ट्रॅप, काळ्या रंगाचे सायलेन्सर, रिम्स, किकस्टार्ट लिव्हर आणि पेडल्स दिसतील.