Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईकही महागली; खरेदी करण्याआधी पाहा नवे दर

Royal Enfield : बाईक घेणाऱ्या अनेकांचंच स्वप्न असतं की आपल्या दारी रॉयल एनफिल्ड यावी. पण, आता मात्र हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी काहीसा वेळ लागू शकतो. कारण, इथंही दरवाढ लागू झालिये.   

सायली पाटील | Updated: May 31, 2023, 09:49 AM IST
Royal Enfield ची सर्वात स्वस्त बाईकही महागली; खरेदी करण्याआधी पाहा नवे दर  title=
Royal Enfield Hunter 350 bike price and features

Royal Enfield Hunter 350 Price Hike: रॉयल एनफिल्ड.... या कंपनीच्या नावात ज्याप्रमाणं Royal आहे त्याचप्रमाणं ही बाईस रस्त्यावरून जातानाही तितकीच रॉयल वाटते. बाईकचे फिचर असो किंवा लूक, सगळ्याच बाबतीत एक वेगळाच रुबाब. अशा या बाईक कंपनीकडून मागील वर्षी तुलनेनं कमी वजनाची आणि खिशाला परवडेल अशा दरातील एक बाईक लॉन्च केली. 

गेल्या वर्षी लॉन्च होणाऱ्या या बाईकचं नाव Royal Enfield Hunter 350. चेन्नईतील प्लांटमधून येणारी ही सर्वात कमी किमतीची रॉयल बाईक. पण, आता मात्र तिची किंमत बदलली आहे. कारण, ही बाईक हजारो रुपयांनी महागली आहे. 

TVS Ronin, Jawa 43, Honda CB350RS अशा बाईकना टक्कर देणारी हंटर रेट्रो आणि मेट्रो अशा ट्रीम लेवलमध्ये विकली जाते. यातही बाईकचे तीन व्हेरिएंट उपलब्ध आहेत. अशा या बाईकची किंमत आता वाढवण्यात आली असून, ती 1.49 लाखांवरून थेट 1.75 लाख रुपये (एक्स शोरूम) इतक्या दरावर पोहोचली आहे. 

रॉयल एनफिल्ड हंटरची किंमत आणि वैशिष्ट्य 

हंटरच्या Retro Hunter Factory Series ची किंमत सध्या बदलण्यात आलेली नाही. त्यामुळं ही बाईक 1.49 रुपयांनाच उपलब्ध आहे. तर, बाईकचा मिड व्हेरिएंट Metro Hunter Dapper Series आता 1.70 लाख रुपयांना तुम्ही खरेदी करु शकता. हंटरची टॉप व्हेरिएंट असणारी Metro Hunter Rebel Series तब्बल 1.75 लाख रुपयांना विकली जाणार आहे. या बाईकची किंमत पूर्वी 1.72 लाख रुपये इतकी होती. तेव्हा तुम्ही हंटर खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर आतापासून नव्यानं आकडेमोड करायला सुरुवात करा.

हेसुद्धा वाचा : Google Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?

 

फिचर्सबाबत सांगावं तर, हंटर 350 मध्ये 349cc इंजिन देण्यात आलं आहे. यामध्ये एयर-ऑयल कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन असून ते 6,100 RPM वर 20.2 bhp आणि 4,000 RPM वर 27 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स असणारी ही बाईक 36.2 kmpl चा मायलेज देते असा दावा कंपनीकडून करण्यात येतो. 

दरम्यान, आता तुम्ही इतकी रक्कम भरणार असालच तर, रॉयल एनफिल्डच्या आगामी मॉडेल्सबाबतही जाणून घ्या. कारण येत्या काळात कंपनी नवी बुलेट 350 आणि हिमालयन 450 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं आता तिथेच बाईकप्रेमींच्या नजरा लागून राहिल्या आहेत.