Samsung Galaxy M14 5G Sale : अनेकांना महागडे आणि फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करायचे असतात. पण बजेट नसल्यामुळे स्मार्टफोन विकत घेता येत नाही. मात्र आता तुमच्या खिशाला परवडेल असा फोन बाजारात उपलब्ध झाला आहे. गेल्या आठवड्यात Samsung Galaxy M14 5G हा फोन भारतात लॉन्च झाला आहे. या फोनची विक्री सुरू झाली असून ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवर सॅमसंगच्या या फोनच्या खरेदीवर चांगली ऑफर मिळत आहे. हा फोन 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी या फोनमध्ये असणार आहे.
Samsung Galaxy M14 5G मध्ये 6.6-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. ज्यामध्ये वॉटरड्रॉप नॉच डिझाइन देण्यात आले आहे. या सॅमसंग फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x 2408 पिक्सेल आहे आणि ते 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या फोनला 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजचा सपोर्ट मिळेल. तसेच त्याचे अंतर्गत स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी उपलब्ध असून ज्यामध्ये 15W USB Type C फास्ट चार्जिंग फीचर देण्यात आले आहे. कंपनी फोनसोबत चार्जर दिला नसला तरी हा फोन Android 13 वर आधारित OneUI 5.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या फोनला मागच्या बाजूस ट्रिपल कॅमेरा दिला असून कॅमेरा 50MP आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13MP कॅमेरा आहे.
सॅमसंगचा हा स्मार्टफोन 4GB RAM + 128GB आणि 6GB RAM + 128GB सह बाजारात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 14,990 रुपये असून Amazon वरून हा फोन विकत घेतल्यावर 1,500 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. यासोबतच एक्सचेंज ऑफर आणि ईएमआय आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
Samsung Galaxy S22 हा जुना 5G स्मार्टफोन असून यामध्ये उत्तम कॅमेरा सेटअप आणि अतिशय कमी दरात हा फोन विकत घेऊ शकता. आत्तापर्यंत देशात जवळपास 51,000 रुपयांचा दुसरा कोणताही फ्लॅगशिप फोन उपलब्ध नाही. S23 आणि फोनमधील सर्वात मोठा फरक म्हणजे चिपसेट आणि बॅटरी. स्टीरिओ स्पीकर, IP68 वॉटर रेझिस्टंट रेटिंग, 25W फास्ट चार्जिंग, 6.1-इंचाचा AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरे या दोन्ही उपकरणांवर अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.