Samsung Galaxy M30s आज भारतात लाँच

दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध असणार हा स्मार्टफोन

Updated: Sep 18, 2019, 02:57 PM IST
Samsung Galaxy M30s आज भारतात लाँच

मुंबई : Samsung ने आज भारतात Galaxy M30s स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Galaxy M30 चा अपग्रेड वर्जन आहे. कंपनीने या अगोदर दिलेल्या माहितीनुसार, हा स्मार्टफोन सुपर एमोलेड डिस्प्लेसोबत Exynos 9611 Soc देण्यात आलेला आहे. 

तसेच हा स्मार्टफोन 6000mAh बॅटरीसोबत लाँच झालेला आहे. ज्यामध्ये रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअपसोबत वॉटरड्रॉप पाहायला मिळणार आहेत.  Samsung Galaxy M30s या स्मार्टफोनला भारतात १३,९९९ रुपयांत लाँच केलं आहे. या किंमतीत ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट देण्यात आला आहे, तसेच ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी वेरिएंटची किंमंत १६,९९९ रुपयात आहे. हा स्मार्टफोन Amazon India आणि Samsung च्या ऑनलाईन स्टोरमध्ये २९ डिसेंबरनंतर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 

तसेच Samsung Galaxy M30s मध्ये ६.४ इंचाची Infinity U Super Amoled डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर Exynos9611 चिपसेट दिलं आहे. ARM Mali G72 MP3 GPU सोबत येत आहे. 

महत्वाचं म्हणजे हा स्मार्टफोन Widevine L1 सर्टिफिकेशनसोबत येत आहे. ज्यामुळे Netflix, Amazon Prime Video आणि इतर सर्व्हिस HD मध्ये पाहता येणार आहे.