सॅमसंगचा ३जीबीचा स्वस्त स्मार्टफोन

सॅमसंगने गॅलॅक्सी J7 Nxt हा स्मार्टफोन भारतात जुलैमध्ये लाँच केला होता. हा स्मार्टफोन २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला होता. आता याचा नवा अपग्रेडेट व्हेरिएंट लाँच करण्यात आलेय. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह हा स्मार्टफोन ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलाय. हा स्मार्टफोन ऑफलाईन स्टोर्सवरही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलाय.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 24, 2017, 10:54 AM IST
सॅमसंगचा  ३जीबीचा स्वस्त स्मार्टफोन title=

नवी दिल्ली : सॅमसंगने गॅलॅक्सी J7 Nxt हा स्मार्टफोन भारतात जुलैमध्ये लाँच केला होता. हा स्मार्टफोन २ जीबी रॅम आणि १६ जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला होता. आता याचा नवा अपग्रेडेट व्हेरिएंट लाँच करण्यात आलेय. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह हा स्मार्टफोन ऑनलाईन वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवण्यात आलाय. हा स्मार्टफोन ऑफलाईन स्टोर्सवरही विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलाय.

फीचर्स

स्क्रीन - सॅमसंग गॅलॅक्सी जे ७ नेक्स्टमध्ये ५.५ इंचाचा एचडी सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आलाय. याशिवाय १.६ गिगाहर्टझ ओक्टाकोर प्रोसेसर देण्यात आलाय. ड्युअल सिमला सपोर्ट करणारा हा फोन ४ जी व्हिओएलटीई नेटवर्कसह काम करतो.

अँड्रॉईड - हा स्मार्टफोन अँड्रॉईड ७.० नूगावर चालतो. यात 3000 mAh बॅटरी आहे. 

रॅम आणि स्टोरेज - या स्मार्टफोनची मेमरी ३२ जीबी असून ३ जीबी रॅमवर चालतो. याची मेमरी २५६ जीबीपर्यंत एक्सपांड करु शकतो.

कॅमेरा - फोटोग्राफीसाठी गॅलॅक्सी जे ७ नेक्स्टमध्ये १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा देण्यात आलाय. तर ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

किंमत - Galaxy J7 nxtच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबीची किंमत १२,९९० इतकी आहे.