अाता चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आलाय स्मार्ट अलार्म...

नवीन आलेल्या स्मार्ट अलार्म प्रणालीमुळे तुम्ही आता निर्धास्तपणे झोपू शकता.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 6, 2017, 03:29 PM IST
अाता चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आलाय स्मार्ट अलार्म... title=

बर्लिन : नवीन आलेल्या स्मार्ट अलार्म प्रणालीमुळे तुम्ही आता निर्धास्तपणे झोपू शकता. वैज्ञानिकांनी तयार केलेल्या या स्मार्ट अलार्ममुळे चोरी होण्यापासून तुमचे घर सुरक्षित राहू शकते. 

कसे ते पाहुया...

चोर घरात घुसताच या अलार्ममुळे घराच्या तापमानात बदल होईल. त्याचबरोबर खिडक्यांमध्ये कंपन जाणवेल आणि अलार्म देखील वाजेल. 

सोनाराच्या दुकानात, आर्ट गॅलरीत आणि बॅंकांमध्ये सुरक्षेसाठी आरसे असतात आणि ते अलार्मशी जोडले जातील. पण अलार्म तेव्हाच वाजेल जेव्हा आरसे फुटतील. सुरक्षात्मक आरशात विशिष्ट धातूचे धागे असतात. त्यामुळे काच फुटल्यावर अलार्म वाजू लागतो. मात्र तो आरसा तो़डण्यासाठी कटिंग टॉर्च किंवा ड्रिलचा वापर केल्यास तो अलार्म खूप जोरात वाजतो किंवा वाजतच नाही. 

तोडगा काढला

जर्मनीच्या फ्राउनहोफर गेजेलशाफ्टच्या वैज्ञानिकांनी चोरांपासून बचाव करण्यासाठी ही स्मार्ट अलार्म प्रणाली विकसित केली आहे. त्यामध्ये या समस्येचा विचार करुन त्यावर तोडगा काढण्यात आला आहे. या नव्या स्मार्ट अलार्म प्रणालीत थर्मल आणि मॅकेनीकल दबाव लगेच कळतो. इतकेच नाही तर काच ठोठावल्याने किंवा आग लागल्याने देखील अलार्म वाजतो.