32 inch Smart TV: 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 5 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय, जाणून घ्या ऑफर

18 हजार मुळ किंमत असलेला 'हा' स्मार्ट टीव्ही खरच इतक्या कमी किमतीत मिळतोय, ऑफर एकूण तुम्हालाच आश्चर्याचा धक्का बसेल

Updated: Oct 29, 2022, 06:55 PM IST
32 inch Smart TV: 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही 5 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतोय, जाणून घ्या ऑफर title=

मुंबई : दिवाळी (Diwali offer) संपली तशी अनेक कंपन्याचे दिवाली सेल (Diwali Sale) देखील संपल्याचे तुम्हाला वाटतं असेल.मात्र तसे अजिबात नाही आहे, कारण दिवाळी संपून सुद्धा अनेक कंपन्या अजूनही ग्राहकांना अनेक वस्तुंवर ऑफर देत आहेत. आता एका कंपनीने 32 इंचाचा स्मार्ट टीव्हीवर भरघोस ऑफर दिली आहे. ही ऑफर एकूण तुम्ही क्षणाचाही विलंब न लावता ही टिव्ही खरेदी कराल. नेमकी टीव्हीवर ऑफर काय आहे, ते जाणून घेऊयात. 

सध्या स्मार्ट टीव्हीचा (Smart TV) जमाना आहे, त्यामुळे प्रत्येकाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याकडे कल असतो. त्यामुळे स्मार्ट टीव्ही खरेदी करण्यास इच्छूक असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण या ऑफरमध्ये 20 हजार ते 25 हजार रूपयांना मिळणाऱ्या स्मार्ट टीव्ही अगदी 5 हजाराहून कमी किंमतीत मिळतोय. ही ऑफर ऐकून अनेकांनी स्मार्ट टीव्ही खरेदीला सुरुवात देखील केली आहे. 

 कोणती स्मार्ट टिव्ही मिळणार?

फ्लिपकार्टच्या या ऑफरमध्ये तुम्हाला Reality 32 Inch HD Ready Smart Android TV खरेदी करता येणार आहे. जर ग्राहकाला लिस्टिंग प्राईजनुसार हा LED टीव्ही खरेदी करायचा असेल तर त्यांना त्यासाठी 13 हजार 999 रूपये द्यावे लागणार आहे.  कोणत्याही 32-इंचाच्या एलईडी टीव्हीनुसार ही किंमत आधीच कमी आहे. त्यात कंपनी ग्राहकांना आणखीण ऑफऱ देऊ इच्छित आहे. 

'या' ऑफरमध्ये होणार किंमत कमी?

जर तुमच बजेट आणखीण कमी असेल तर तुम्हाला एक्सचेंज ऑफरमध्ये ही स्मार्ट टिव्ही खरेदी करता येणार आहे. तुम्ही तुमचा जुना एलईडी टीव्ही कंपनीला देऊन, या नवीन एलईडी टीव्हीच्या (LED TV) किंमतीत मोठी कपात करू शकता. या एलईडी टीव्हीवर एक्सचेंज ऑफर दिली जात आहे ती 11 हजारची आहे, आणि जर ती पूर्णपणे लागू केली गेली तर कंपनीच्या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत सुमारे 3 हजार होईल. कोणत्याही 32 इंचाच्या स्मार्ट एलईडी टीव्हीनुसार (LED TV) ही किंमत खूपच कमी आहे, त्यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होणार आहे.