MG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत?

MG Cheapest Electric Car: MG मोटर्सने आपली सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च करत आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे.

Updated: Oct 29, 2022, 03:51 PM IST
MG Air EV: MG ची 'छोटी' स्वस्त इलेक्ट्रिक कार, 300km मायलेज, पाहा किती आहे किंमत? title=

MG Air EV Launch Date: सध्या पेट्रोल-डिझेलबरोबरच सीएनजी आणि पीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे गाड्या घेणे सगळ्यांनाच आता परवडत नाही. त्यामुळे ईलेक्ट्रीक कारची मागणी वाढली आहे. आता भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. टाटा मोटर्सने अलीकडेच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata tiago EV लॉन्च केली. या वाहनाला पहिल्याच दिवशी 10 हजारांहून अधिक बुकिंग मिळाले आहे. आता MG Motors देखील आपली सर्वात स्वस्त कार भारतात आणणार आहे. MG Motors ने एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार MG Air EV भारतीय बाजारपेठेत येत असल्याची घोषणा केली आहे. त्याचे लॉन्चिंग 2023 च्या सुरुवातीला होणार आहे. म्हणजेच 2023 च्या ऑटो एक्स्पोमध्ये ही छोटी कार पाहता येईल. या छोट्या कार संबंधित सर्व तपशील जाणून घ्या.

300km मायलेज

जागतिक बाजारपेठेत हे वाहन वुलिंग एअर (Wuling Air) या नावाने ओळखले जाते.  ही कार दोन प्रकारामध्ये उपलब्ध असणार आहे. शॉर्ट व्हीलबेस (2 प्रवाशांसाठी) आणि  लॉन्ग व्हीलबेस (4 प्रवाशांसाठी). जेथे शॉर्ट व्हीलबेस आवृत्तीला 17.3kWh ची बॅटरी पॅक मिळतो, जो 200km पर्यंतची रेंज आहे. लांब व्हीलबेस आवृत्तीमध्ये मोठी 26.7kWh बॅटरी आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 300km पर्यंत धाऊ शकते. यामध्ये 40PS रियर-ड्राइव्ह ई-मोटर देण्यात आली आहे. 

डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ही कार आकाराने छोटी आहे. त्याला बॉक्सी प्रोफाइलसह मोठे दरवाजे देण्यात आले आहेत. लांब व्हीलबेस आवृत्तीला एक लहान मागील बाजूस खिडकी देण्यात आली आहे. त्याच्या समोर एक पसरलेली लाइट बार आहे जी ORVM पर्यंत पोहोचते. 

आयामांबद्दल बोलायचे झाले तर कारमध्ये 2,010mm व्हीलबेस दिला जाऊ शकतो. वाहनाची एकूण लांबी सुमारे 2.9 मीटर असण्याची शक्यता आहे. म्हणजेच मारुती अल्टोपेक्षा 400 मिमी लहान असेल. भारतीय बाजारपेठेत या वाहनाची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.