स्मार्टफोन होईल उन्हात चार्ज? वापरावं लागेल हे डिव्हाईस, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

तुमचा मोबाईल जर उन्हामुळे चार्ज झाला तर? जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन उन्हाने चार्ज करायचा असले तर तुम्हाला एका डिव्हाईसची गरज लागेल.

Updated: Jun 4, 2022, 05:51 PM IST
स्मार्टफोन होईल उन्हात चार्ज? वापरावं लागेल हे डिव्हाईस, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स title=

Smartphone Hacks - तुमचा मोबाईल जर उन्हामुळे चार्ज झाला तर? जर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन उन्हाने चार्ज करायचा असले तर तुम्हाला एका डिव्हाईसची गरज लागेल. ज्यानं तुम्ही तुमचा मोबाईल थेट उन्हाने चार्ज करू शकाल. याने तुम्ही तुमचा केवळ फोनच नाही तर इतरही डिव्हाइसेस चार्ज करू शकतात.  

पावसाळ्यात बत्ती गुल होण्याच्या घटना आपल्याला काही नवीन नाही (power cuts in rainy season ). अनेक भागांमध्ये पावसाळ्यात अनेक दिवस वीजपुरवठा खंडित असतो. अशात तुमचा स्मार्टफोन चार्ज ठेवणं कठीण होतं. जर तुमच्याकडे इन्व्हर्टर (Inverter) असेल तर काही काळ तुम्हाला मदत मिळू शकते. मात्र सर्वांकडे इन्व्हर्टर असतोच असं नाही. 

तुम्हाला तुमचा फोन चार्ज करायचा असेल तर तुम्ही उन्हाचा ( solar energy for charging smart phone ) वापर करू शकतात. खरंतर बाजारात असे अनेक प्रोडक्ट्स आहेत ज्यांच्यामुळे तुम्ही उन्हात तुमचा फोन चार्ज करू शकतात. यातील सर्वात सोपा पर्याय सोलार पॉवर बँक. 

नक्की काय आहे हे प्रॉडक्ट? 

(solar power bank ) पॉवर बँक बाबत तुम्हा सर्वांना ठाऊक असेलच. आपण सर्वजण पॉवर बँकच्या सहाय्याने आपला फोन चार्ज करतो. बाजारात अशा काही पॉवर बॅंक्स उपलब्ध आहेत ज्या सौरऊर्जेवर चार्ज होऊ शकतात. कोणत्याही ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवरून (E commerce ) तुम्ही ही पॉवर बँक विकत घेऊ शकतात. 

किती रुपये आहे या पॉवर बँकची किंमत?  

तसे तर बाजारात स्वस्त ऑप्शन देखील उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या क्वालिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीची सोलर पावर बँक घेण्याचा विचार करत असाल तर त्यांची किंमत साधारण 5500 रुपये असते. या पॉवर बँकची साधारण क्षमता ही 20 हजार mAh असते.  

यातील काही कंपन्या त्यांची पॉवर बँक ही वॉटरप्रूफ असल्याचा दावा करतात. याच्या मदतीने तुम्ही तुमचा मोबाईल स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्ट वॉच चार्ज करू शकतात. पॉवर बँकांची क्षमता 20 हजार mAh असल्यास तुम्ही तुमचा 5 हजार mAh चा स्मार्टफोन साधारणतः चारदा चार्ज करू शकतात. 

smartphone charging tips use this divice and chanrge your cell phone free of cost