Realme 10s Specification : रियलमीने (Realme) सर्वांना परवडेल असा दमदार बॅटरी असलेला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन रियलमी 10 सीरिजची (Realme 10 Series) लेटेस्ट एडीशन आहे. या सीरिजमध्ये रियलमी 10 (4G), रियलमी 10 प्रो 5 जी, रियमली 10 प्रो (5G) आणि रियलमी 10 प्रो + 5G यासारखे दमदार स्मार्टफोन मार्केटमध्ये आहेत. मात्र आता आपण रियलमी 10s बाबत सविस्तर जाणून घेऊयात. (tech news realme launch realme 10s know features and specification)
रियलमी 10s स्मार्टफोनचा 6.6 इंचचा आपीएस एलसीडी डिस्पले आहे, जो 1080x2408 पिक्सलचं फुल एचडी+रेजोल्यूशनसोबत मिळतो. स्क्रीनमध्ये 400 निट्स ब्राईटनेस आहे. स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हा स्मार्टफोन एनड्रॉईड 10 ओएस (Android 12 OS) या प्रणालीवर चालेल.
या स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा हा 50 MP आहे. तर 2 MP चं प्रोट्रेट लेंस आहे. सोबतच एलईडी फ्लॅशही आहे. तसेच फ्रंट कॅमेरा हा 8 एमपी इतका आहे.
स्मार्टफोनमध्ये 33 व्हॉल्ट्स फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. तर बॅटरी ही 5 हजार एमएच आहे. तसेच स्मार्टफोनचं रॅम 8 जीबी इतका आहे. तर स्टोरेज 128 जीबी आहे. स्मार्टफोन फक्त 191 ग्रॅम इतका आहे.
रियलमी 10s 8 जीबी रॅम+ 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम+256 स्टोरेजची किंमत अनुक्रमे 13 हजार 79 आणि 15 हजार 397 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन स्ट्रीमर ब्लू आणि क्रिस्टल ब्लॅक या 2 रंगात उपलब्ध आहे.