तुम्ही Telegram वापरता का? आधी ही बातमी वाचा

Telegram Users : भारतात मोठ्या प्रमाणात टेलीग्रामचा वापर केला जातो आहे. सर्वात सुरक्षित मेसेजिंग अॅप असल्याने अनेक महत्त्वांच्या कामासाठी वापरला जातो. पण यावर एक काम गुपचूप केलं जातं आहे. जर तुम्ही हे काम करत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 

Updated: Jan 31, 2023, 03:31 PM IST
तुम्ही Telegram वापरता का? आधी ही बातमी वाचा
telegram users are Netflix Prime Video Disney plus Hotstar latest ott films free So beware is illegal

Free OTT :  भारताचा लोकप्रिय अॅप टेलिग्राम (Telegram) जर तुम्ही वापरत असाल तर आधी ही बातमी वाचा...भारतीय यूजर्स मोठ्या संख्येने व्हॉटस्अप (WhatsApp), फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्राम (Instagram) वापरतात. त्यासोबतच टेलिग्रामवरही वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सुरक्षित मेसेजिंगसोबतच (messaging app) यावर असणारे ऑनलाइन एडिटिंग, स्टेटस हे उत्कृष्ट वैशिष्ट्येमुळे लाखो यूजर्स हे वापरतात. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये हा अॅप कामासाठी वापरला जातो. कारण हा सुरक्षित आणि खात्रीदायक अॅप आहे. पण गेल्या काही वर्षात या अॅपचा गैरवापर वाढला आहे. मोठ्या संख्येने भारतीतील एक वर्ग या अॅपवर गुपचूप एक काम करतं आहे. या कामामुळे नावाजलेल्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. या कामामुळे त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावं लागू शकते. 

तुम्ही तर 'हे' काम करत तर नाही ना?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या अॅपवरील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म मग ते नेटफ्लिक्स (Netflix ) असो वा प्राइम व्हिडीओ (Prime Video) आणि डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney plus Hotstar) यावर दिसणारे चित्रपट विनामूल्य पाहता येतात. ज्यामुळे या ओटीटी प्लॅटफॉर्मला खूप मोठा फटका बसला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण चित्रपटांचा दर्जा इतका उत्तम आहे की लोक हे चोरलेले चित्रपट पाहण्यासाठी खेचले जातात. या अॅपवर बॉलीवूड चित्रपटदेखील पाहिल्या मिळतात. त्यामुळे लोक ते मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करतात आणि घर बसल्या फुकट चित्रपटाचा आनंद घेतात. अगदी चित्रपट नाही, तर वेबसीरीजदेखील इथे पाहिला मिळतात. (telegram users are Netflix Prime Video Disney plus Hotstar latest ott films free So beware is illegal)

उत्कृष्ट दर्जा, एकही पैसा खर्च न करता कुठल्याही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडीओ इत्यादी विकत न घेता त्यावरील फिल्म आणि वेबसीरीज तुम्ही पाहू शकता. याचा फटका या कंपन्यांना पडतोय. कारण या कंपन्याचा स्वत:चा वेबसीरीज असतात. त्याही या अॅपवर पाहता येतं आहेत. 

धोक्याची घंटा!

आता लक्षात घ्या जर तुम्ही टेलिग्रामवरून OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट डाउनलोड करत असाल, वेळीच सावध व्हा. कारण हे बेकायदेशीर आहे आणि जर तुम्ही असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला व्हिडीओ पायरसीसाठी न्यायालयात जावे लागू शकतं, त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.