जबरदस्त Top-5 Flip Phone, एक फोन तर पाण्यात धुवूनही वापरू शकता

मोबाईलप्रेमींमध्ये फ्लिफ फोनची क्रेझ आजही कायम आहे. फोन खिशातून काढून फ्लिप वर करून बोलण्याची एक वेगळीच स्टाईल असते.

Updated: Aug 4, 2022, 03:24 PM IST
जबरदस्त Top-5 Flip Phone, एक फोन तर पाण्यात धुवूनही वापरू शकता title=

Top-5 Flip Phone: मोबाईलप्रेमींमध्ये फ्लिफ फोनची क्रेझ आजही कायम आहे. फोन खिशातून काढून फ्लिप वर करून बोलण्याची एक वेगळीच स्टाईल असते. त्यामुळे फ्लिप फोनची आवड असणारे मोबाईलप्रेमी मोठ्या प्रमाणात आहे. Moto Razr मालिका 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला सर्वाधिक लोकप्रिय झाली होती. त्यानंतर अनेक फ्लिप फोन बाजारात आले. आता टच स्क्रीन फ्लिप फोन आल्याने पुन्हा एकदा क्रेझ येत आहे. 

नोकियाच्या फोनने एक काळ गाजवला आहे. गेल्या वर्षी, कंपनीने 4G Nokia 2720 Flip ची घोषणा केली आहे. हा फोन 1.3-इंच बाह्य स्क्रीनसह येतो, तर मुख्य स्क्रिन  2.8-इंचाचा QVGA डिस्प्ले दाखवते. या फोनमध्ये 1500mAh काढण्योजोगी बॅटरी असून 11 तास चालू शकते. या फोनची 4G कनेक्टिव्हिटी लक्षात घेता, लॅपटॉप किंवा टॅबलेटसाठी 4G हॉटस्पॉट म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. त्याची किंमत $79.99  म्हणजेच रु. 6,200 आहे.

Alcatel GO Flip V, जो LTE कनेक्टिव्हिटीसह येतो. या फोनला छोटा बाह्य डिस्प्ले आणि मोठा 2.8-इंचाचा कलर डिस्प्ले आहे. अपेक्षेप्रमाणे, डिस्प्ले टचस्क्रीन नाही. Nokia 2720 प्रमाणे, GO Flip V फोन कॉल करणे आणि संदेश पाठवणे यासारख्या मूलभूत कामांसाठी चांगला आहे. फोनमध्ये GPS, Wi-Fi आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे. नवीन-युगाच्या कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये मर्यादित वापर अटी असतील. Alcatel GO Flip V हा 150 डॉलर्स म्हणजेच सुमारे 11 हजार रुपयांना उपलब्ध आहे. 

RAZR 5G जुन्या काळातील आयकॉनिक फ्लिप डिझाइन फोन आहे.  तुलनेनं 2.8-इंच बाह्य स्क्रीन तसेच फोल्ड करण्यायोग्य 6-इंच अंतर्गत डिस्प्लेसह येते. फोन एक वर्षाहून जुना असून 8GB पर्यंत RAM सह Qualcomm SM7250 Snapdragon 765G प्रोसेसरसह येतो. यात 48MP रियर कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सरसह नवीन-युगातील स्मार्टफोनची सर्व महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. भारतात याची किंमत 54 हजारांच्या जवळपास आहे.

Galaxy Z Flip3 अनेक आकर्षक रंगांमध्ये आहे. हा फोन 6.7-इंचाच्या अंतर्गत डिस्प्ले आणि 1.9-इंचाच्या बाह्य स्क्रीनसह येतो. यात 2021 च्या सर्वोत्कृष्ट प्रोसेसरपैकी एक, स्नॅपड्रॅगन 888 असून 8GB पर्यंत RAM, ड्युअल 12MP रीअर कॅमेरे, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट, 15W सह 3300mAh बॅटरी आणि IPX8 सर्टीफिकेशन आहे. भारतात याची किंमत 84,499 रुपये आहे.

Kyocera रग्ड फोन मोबाईलमध्ये लोकप्रिय आहे. एक मजबूत फोन म्हणून याकडे पाहिलं जातं. जमिनीवर आदळला तरी काही होत नाही. त्याचबरोबर पाण्यात धुवून वापरू शकता. बाहेरून, फोनमध्ये 1-इंचाचा डिस्प्ले आहे, तर आतमध्ये 2.6-इंचाचा 320 x 240 पिक्सेल डिस्प्ले मिळेल. फोनची बॅटरी मजबूत असून पूर्ण चार्ज केल्यावर 8 तास चालेल. त्याची किंमत 240 डॉलर म्हणजेच सुमारे 18 हजार रुपये आहे.

Tags: