Redmiकडून 3 नवीन स्‍मार्टफोन लाँच, फिचर्स पहा

Mi इंडियाच्या एका सब-ब्रांड Redmiइंडियाने आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10च्या सीरिज (Redmi Note 10 Series)बाजारात लाँच केल्या आहेत. रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro)आणि रेडमी नोट 10(Redmi Note 10) सारखे 3 स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, जे नवीन डिझाइन्स आणि नवीन तंत्रज्ञानसह आले आहेत. यामध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 120 हर्ट्जपर्यंत सुपर एएमओ-एलईडी डिस्प्ले आहे.

Updated: Mar 14, 2021, 08:56 PM IST
Redmiकडून 3 नवीन स्‍मार्टफोन लाँच, फिचर्स पहा title=

मुंबई : Mi इंडियाच्या एका सब-ब्रांड Redmiइंडियाने आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10च्या सीरिज (Redmi Note 10 Series)बाजारात लाँच केल्या आहेत. रेडमी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max), रेडमी नोट 10 प्रो (Redmi Note 10 Pro)आणि रेडमी नोट 10(Redmi Note 10) सारखे 3 स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, जे नवीन डिझाइन्स आणि नवीन तंत्रज्ञानसह आले आहेत. यामध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 120 हर्ट्जपर्यंत सुपर एएमओ-एलईडी डिस्प्ले आहे.

Redmi Note 10 Pro मॅक्समध्ये 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज आहे, ज्याची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. हा फोन डार्क नाईट,  ग्लेशियल ब्लू  आणि विंटेज ब्रोंज या रंगात उपब्ध आहे. Xiaomiने फोनच्या  डिझाइनला इवोल असे नाव दिलं आहे. या मोबाईला ग्लास बॅक पॅनल आणि सुंदर असा लूक आहे.

त्यात वॉल्यूमआणि पावर बटन डाव्याबाजूला दिले आहे.  मोबाईलच्या वरच्या बाजूला 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि खालच्या बाजूला टाइप-सी यूएसबी चार्जींग पोर्ट दिलेलं आहे, तर मोबाईलच्या दोन्ही बाजूला डुअल स्पीकर आहे.

Nano Sim Slot
फोनच्या उजव्या बाजूला ट्रे आहे, ज्यात दोन नॅनो सिम कार्ड स्लॉट आहेत. हा डिव्हाइस  सरळ तुमच्या टीव्ही, सेट-टॉप-बॉक्स किंवा AC सारख्या आणखी काही उपकरणे वापरायला मदत करतो . फ्रेमच्या वरच्या बाजूला आयआर ब्लास्टरही दिला आहे.

6.67 इंचाचा सुपर एएमओ-एलईडी डिस्प्ले (Mobile Phone Display)
स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा  सुपर एएमओ-एलईडी डिस्प्ले1880 ×2400 पिक्सेल आणि 20:9 आस्पेक्ट रेश्योची सुविधा आहे या फोनमध्ये 60 Hz ते 120 Hz रिफ्रेश रेट्सचा निवडण्याचा पर्याय ही आहे.

ऊन्हात ही दिसणार स्‍क्रीन (Mobile Screen Brightness)
याचा डिस्प्ले चांगला चालतो आणि usersना  अती सूर्यप्रकाशातही फोन वापरण्यात कोणतीही अडचण येत नाही. Redmi Note 10 Pro Max मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर आहे.

5G Support (Camera Performance)
स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम एमआईयूआई 12 आहे आणि Xiaomiने त्याच्या usersना  वचन दिलय की तो लवकरच ऑपरेटिंग सिस्टम एमआईयूआई 12.5 वर आणनार आहे. रेडमी नोट 10 प्रो मॅक्समध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रावाईड लेन्स, 5 मेगापिक्सल सुपर-मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. यामध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिलेला आहे.

Battery life
नोट 10 प्रो मॅक्समध्ये 5020 mAhची मोठी बॅटरी आहे, जी एक दिवसापेक्षा जास्त काळ चालेल आणि Normal वापर केल्यास, काही अटींखाली दोन दिवस टिकते. यामध्ये 33 वॅटचा इन-बॉक्स फास्ट चार्जर आहे, जे 30 मिनिटांत शून्य ते 59 टक्क्यांपर्यंत चार्ज करु शकते.