आता कारचा वेग ८० किमी प्रति तासापेक्षा अधिक वाढला तर...

गाडीचा वाढता वेग आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे दररोज अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळेच गाड्यांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता एक महत्वपूर्ण नियम आणण्याची तयारी केली आहे. पाहूयात काय आहे हा नियम...

Sunil Desale Updated: Mar 26, 2018, 08:57 PM IST
आता कारचा वेग ८० किमी प्रति तासापेक्षा अधिक वाढला तर... title=
File Photo

नवी दिल्ली : गाडीचा वाढता वेग आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमुळे दररोज अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळेच गाड्यांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आता एक महत्वपूर्ण नियम आणण्याची तयारी केली आहे. पाहूयात काय आहे हा नियम...

येत्या काळात रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने गाड्यांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी एक प्लॅन आखला आहे. या प्लॅननुसार, तुमच्या गाडीचा वेग ८० किमी प्रति तासाहून अधिक झाल्यास कारमध्ये आपोआप अलार्म वाजण्यास सुरुवात होणार आहे. 

काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार, बहुतांश अपघात हे ओव्हर स्पीड आणि चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे होतात. त्यामुळेच ओव्हर स्पीडवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने प्लॅनिंग सुरु केली आहे.

कंपन्यांना लावावं लागणार अलार्म

रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने केलेल्या प्लॅनिंगनुसार, वाहनांमध्ये ऑटोमेटिक अलार्म सिस्टम वाहन कंपन्यांना लावावं लागणार आहे. प्रवासादरम्यान तुमच्या गाडीचा स्पीड निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक झाल्यास अलार्म वाजण्यास सुरुवात होणार आहे. तसेच जोपर्यंत तुम्ही गाडीचा स्पीड कमी करत नाही तोपर्यंत हा अलार्म वाजतच राहणार आहे. 

सेफ्टी फिचरवर ड्राफ्ट तयार

स्पीडवर नियंत्रण मिळवण्यासोबतच इतरही सेफ्टी फिचर्स संदर्भात ड्राफ्ट तयार करण्यात आला आहे. नवे नियम आगामी सहा महिन्यांत लागू होण्याची शक्यता आहे. सरकारला अपेक्षा आहे की, हे नियम लागू झाल्यानंतर रस्ते अपघातांमध्ये घट होईल. स्पीड सेफ्ली अलार्म सोबतच सेफ्टी बेल्ट, एअर बॅग आणि रियर पार्किंग कॅमेराचं फिचरही यामध्ये असणार आहे.

रिवर्स पार्किंग अलर्टही वाजणार

सेफ्टी बेल्टसाठी ड्रायव्हरच्या बाजुला असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीने बेल्ट न लावल्यास अलार्म वाजणार आहे. असं फिचर अनेक कार कंपन्या देत आहेत. यासोबतच रिवर्स पार्किंगसाठी सर्व वाहनांमध्ये पार्किंग अलर्ट लावणं गरजेचं होणार आहे. यामध्ये कारच्या मागील बाजुला सेंसर असणार आहे आणि हे निर्धारित अंतरावर कुठलीही वस्तू आल्यास वाजण्यास सुरुवात होईल.