नवी दिल्ली : सोशल मीडिया सर्वात प्रसिद्ध असलेल्या फेसबूकची हालत आता खूपच खराब झाली आहे. शेअर बाजारात लिस्ट असलेल्या फेसबूकचे शेअरची किंमत खूप खाली घसरली आहे. फेसबूकवर दिवसभर पडिक असणारे आणि त्या माध्यमातून आपल्या प्रोडक्टला प्रमोट करणाऱ्या कंपन्या आपले पेज डिलीट करीत आहेत. तसेच कंपन्यांनी फेसबूकवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींचा ओघही कमी केला आहे.
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात फेसबुकच्या उत्पन्नात जवळपास 75 अब्ज अमेरिकन डॉलर इतका तोटा झाला आहे. यामध्ये भारतीय रुपयांच्या आकडेवारीनुसार 4875 अब्ज रुपयांचा तोटा फेसबूकला गेल्या आठवड्यात झाला आहे आणि अद्यापही तोटा होत आहे. याचबरोबर, शेअर मार्केटमध्ये फेसबूकचे शेअर जवळपास 13 टक्कांनी घसरले आहेत. फेसबूकच्या एका शेअरची किंमत रविवारी फक्त 159.39 अमेरिकन डॉलर इतकी होती. दरम्यान, शेअर मार्केटमध्ये फेसबूकची अशा प्रकारची स्थिती 2012 मध्ये सुद्धा झाली नव्हती. त्यावेळी पण काही प्रमाणात घसरण झाली होती.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, 2012मध्ये न्यूयॉर्कमध्ये शेअरची किंमत 11 टक्कांनी घटल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आतापर्यंत सर्वात खाली म्हणजेच 23.94 डॉलरवर घसरला होता.
याचबरोबर, फेसबूकवर डेटाचोरीच्या प्रकरणामुळे नामुष्कीची वेळ आली आहे. याप्रकरणामुळे नामांकित कंपन्या फेसबूकवरील आपले पेज डिलीट करत आहेत. टेस्ला, स्पेस एक्स, कॉमर्ज बॅंक आणि मोजला यासारख्या कंपन्यांनी आपले फेसबुकवरील पेज डिलीट केले आहे. तसेच, अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी फेसबूकला लोकांविषयींची माहिती सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
तसेच, गूगलवर फेसबुकवरील आपले अकाउंट कशाप्रकारे डिलीट करावे, यासाठी मोठ्याप्रमाणात सर्च करण्यात येत आहे.
दरम्यान, अमेरिकेसह अनेक देशांच्या निवडणुकांमध्ये 5 कोटी फेसबुक सदस्यांचा डेटा चोरून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा आरोप असणाऱ्या केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीवरुन आता भारतीय राजकारणात खडाजंगी सुरू झाली आहे.
फेसबूकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबूकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली आहे. फेसबूक लॉग इनची माहिती विकली जाते फक्त ३४० रुपयांत फेसबुकवरील डेटाचोरीच्या प्रकरणाने अमेरिका, इंग्लंड आणि भारतात रान उठवले असतानाच आणि त्याबद्दल फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्ग याने माफीही मागितली असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आपल्यासाठी अमूल्य असणारे फेसबुकवरील लॉग इनचे डिटेल्स केवळ ३४० रुपयांना विकले जात असल्याचे एका कंपनीने निदर्शनास आणले आहे. अमेरिकेतील निवडणुकीसाठी ५ कोटी फेसबुक युजर्सचे लॉग इन डिटेल्स चोरण्यात आले होते. ही माहिती जर वरील किमतीला विकली असेल तर त्याचे मूल्य जवळपास १७०० कोटी रुपये एवढे आहे.
फेसबुक डेटा चोरी प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने एलॉन मस्क यांना फेसबुकवरील 'स्पेस एक्स'चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनीदेखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला जोर का झटका दिला आहे. 'आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला फटका बसणार नाही, असेही ते म्हणाले.