Twitter : आता 'ही' Tick असेल तर तुमचं अकाऊंट ऑफिशल, जाणून घ्या कसं करायचं ते..

Elon Muskan :  एलोन मस्कन यानी ब्लू टिक्स (Blue ticks) घेण्यासाठी महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे, अशी घोषणा केली होती. आता एलोन मस्कन यांनी ट्विटरच्या ऑफिशल अकाऊंटबद्दल (Twitter official account) मोठा घोषणा केली आहे.

Updated: Nov 10, 2022, 10:01 AM IST
Twitter : आता 'ही' Tick असेल तर तुमचं अकाऊंट ऑफिशल, जाणून घ्या कसं करायचं ते.. title=
Twitter To Add Gray Official Label To Accounts nmp

Twitter To Add Gray Official Label To Accounts : ट्विटर यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी आहे. एलोन मस्कन (Elon Muskan) यांनी ट्विटरचा ताब्या घेतल्यापासून रोज मोठमोठ्या घोषणा करत आहेत.  एलोन मस्कन यानी ब्लू टिक्स (Blue ticks) घेण्यासाठी महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे, अशी घोषणा केली होती. आता एलोन मस्कन यांनी ट्विटरच्या ऑफिशल अकाऊंटबद्दल (Twitter official account) मोठा घोषणा केली आहे. ट्विटर ब्लू टिकची सदस्यता सेवा यूएस, यूके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 5 देशांमध्ये iOS वापरकर्त्यांसाठी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा भारतासह काही देशांमध्ये सुरू होणार आहे.

'हे' Tick असेल तर तुमचं अकाऊंट ऑफिशल

ट्वीटरवर सर्वसामान्यांपासून राजकारणी, सेलिब्रिटी, अधिकारी, पत्रकार असे अनेक लोकांचे अकाऊंट असतात. मग अशावेळी सर्वसामान्य आणि महत्त्वाचे यूजर्स यांच्यामधील फरक कळवा म्हणून एलोन मस्कन यांनी एक युक्ती शोधून काढली आहे. ट्विटरने अधिकारी, राजकारणी, पत्रकार आणि मीडिया हाऊसचे खाते वेगळे करण्यासाठी 'ग्रे' टिक देण्याची तयारी सुरू केली आहे.

Twitter New Official label :

अलीकडेच, कंपनीच्या उत्पादन व्यवस्थापन विभागाच्या संचालक एस्थर क्रॉफर्ड यांनी एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉटमध्ये, ट्विटरच्या अधिकृत खात्यावर एक राखाडी टिक दिसत आहे. यासोबतच युजरच्या खात्याच्या खाली लिहिलेले अधिकृत खाते दिसत आहे. जरी यामध्ये ट्विटरचा नियमित निळा चेकमार्क देखील दिसत आहे. 

Narendra_Modi

कसं घेणार ते ?

क्रॉफर्डने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, यूजर्स हे ग्रे टिक खरेदी करू शकणार नाहीत. ही ग्रे टिक सरकारी खाती, व्यावसायिक कंपन्या, व्यावसायिक भागीदार, प्रमुख मीडिया आउटलेट्स, प्रकाशक आणि काही सार्वजनिक व्यक्तींना दिली जाईल. तर सर्वसामान्यांसाठी ब्लू टिक साठी भारतीयांना  662 रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागणार आहे. व्हेरिफाईड ब्लू टिक तसंच नवीन ग्रे टिक 'ऑफिशिअल' लेबल आता भारतातील अनेक सेलिब्रेटींच्या ट्विटर अकाउंटवर (Twitter accounts of many celebrities in India) दिसू लागले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या खात्याचाही समावेश आहे.