E- Bike : दोन भावांनी 35 हजारांत बनवली ई-बाईक; 5 रुपयांत करता येणार 150 किमी प्रवास

ही ई-बाईक रॉकेट आणि मिसाईलसारखी दिसते असे लोकांचे म्हणणे आहे

Updated: Nov 2, 2022, 05:23 PM IST
E- Bike : दोन भावांनी 35 हजारांत बनवली ई-बाईक; 5 रुपयांत करता येणार 150 किमी प्रवास  title=

गेल्या काही वर्षांपासून पेट्रोलच्या (Petrol) वाढत्या किमतींमुळे बाईक (Bike) किंवा कार (Car) असलेल्या प्रत्येकाची चिंता वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलमुळे अनेक लोक त्यांच्या वाहनाऐवजी (vehicle) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतायत. तर काहींनी इलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय स्विकारला आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मेरठच्या (meerut) दोन भावांनी या समस्येला तोंड देण्यासाठी खास ई- बाईक (e -bike) बनवली आहे. या दोन्ही भावांनी अशी बाईक बनवलीय जी एका वेळेच्या चार्जिंगमध्ये 150 किलोमीटर धावणार आहे. तसेच ही बाईक चार्ज करण्यासाठी फक्त 5 रुपये लागणार आहेत. 16 वर्षीय अक्षय आणि 21 वर्षीय आशिषने ही जबरदस्त

दोन्ही भावांची अप्रतिम 'तेजस'

अक्षय हा पॉलिटेक्निकचा विद्यार्थी आहे आणि आशिषने एम.ए. केले आहे. अक्षयने ई-बाईक बनवण्याचे सर्व तांत्रिक काम पाहिले आहे. त्याला यामधील तांत्रिक गोष्टींचे ज्ञान आहे. सर्वात आधी दोन्ही भावांनी ई-बाईक बनवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून सामान गोळा केले होते. काही नवीन आणि काही जुन्या वस्तू एकत्र करून त्यांनी ही ई-बाईक बनवली आहे. या ई-बाईकचे नाव तेजस आहे. जेव्हा ही बाईक आली तेव्हा लोक म्हणायचे की ती रॉकेट आणि मिसाईलसारखी दिसते, त्यामुळे त्यांनी या ई-बाईकचे नाव तेजस ठेवले आहे. 

फक्त 35000 रुपये खर्च

आशिष कुमारने सांगितले की, "जेव्हा आम्ही वडिलांकडून बुलेट बाईक मागितली होती तेव्हा वडिलांनी सांगितले की आता बुलेटला कोण विचारते. त्यानंतर त्यांना वाटले की अशी मोटरसायकल किंवा बाईक बनवावी जी प्रत्येकाला आवडेल. आज आम्हाला अशी बाईक बनवल्याचा आनंद आहे. जेव्हा आमी तिच्याबरोबर बाहेर जातो तेव्हा प्रत्येकजण त्याबद्दल विचारतो."

ही ई-बाईक बनवण्यासाठी सुमारे 35000 इतका खर्च आला आहे. बाईकच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या बाईकची बॅटरी अवघ्या 5 रुपयांमध्ये चार्ज होते. संपूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे 7 तास लागतात आणि यासाठी एक युनिट वीज वापरली जाते.

150 किमी प्रवास 

7 तासांच्या चार्जिंगनंतर ही बाईक 150 किमीचा प्रवास करू शकते. एवढेच नाही तर या बाईकला बॅक गियर देखील मिळतो. हे तयार करण्यासाठी पीव्हीसीचा वापर करण्यात आला आहे. बाईकमध्ये बॅटरी लावलेली आहे. बाईकमध्ये स्पीड वाढवण्यासाठी एक बटनही देण्यात आले आहे. या ई-बाईकचा कमाल वेग 60 ते 65 किमी प्रतितास आहे.